Sun, Nov 18, 2018 04:59होमपेज › Kolhapur › हेगडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका : डॉ. भालचंद्र मुणगेकर (व्हिडिओ)

हेगडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका : डॉ. भालचंद्र मुणगेकर (व्हिडिओ)

Published On: Dec 28 2017 5:22PM | Last Updated: Dec 28 2017 7:27PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रवीण मस्के

केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या राज्यघटना बदलासंदर्भातील व्यक्तव्याचा माजी कुलगुरू आणि जेष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आज समाचार घेतला. बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या हेगडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे, असे मत डॉ. मुणगेकर यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर नोटाबंदीचा निर्णय आणि जीएसटीची अंमलबजावणी देशाच्या आर्थिक विकासाला मागे घेऊन जाणारी आहे, असेही डॉ. मुणगेकर यांनी स्पष्ट केले. 

डॉ. मुगणेकर म्हणाले, 'मंत्री हेगडे यांनी संसदेची दोन्ही सभागृह व जनतेची माफी मागावी असा आग्रह धरला आहे याला पाठिंबा आहे. देशातील उपेक्षितांना अधिकार देऊ नयेत अशी संघ परिवाराची भूमिका आहे. ते भारताची धर्मनिरपेक्षता मानत नाहीत. देशावर कोणत्याही जाती व समुहाची नसून सर्व धर्मियांची मालकी असून, सर्व नागरिक समान आहेत. बेजबाबदार वक्तव्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी मंत्री हेगडे यांना राज्य घटनेचा अवमान केल्याबद्दल मंत्रीमंडळातून बडतर्फ करावी.' 

काळापैसा, बनावट चलन आणि दहशदवादाला आळा घालण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेतला गेला. यामुळे विकासाचा वेग कमी झाला आहे. पंतप्रधनांना असा निर्णय घोषित करण्याचा अधिकारी नाही. या निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यातील एकही उद्दिष्ट साध्य करू शकले नाहीत. उलट नोटबंदी म्हणजे दोनशे वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा (इकॉनॉमिक फ्रॉड) आहे, अशी टीकाही डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली.