Wed, Nov 21, 2018 17:28होमपेज › Kolhapur › भाजप-सेनेच्या घोटाळ्याने वाटोळे : अजित पवार

भाजप-सेनेच्या घोटाळ्याने वाटोळे : अजित पवार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


गारगोटी : प्रतिनिधी

कष्टकरी शेतकर्‍यांना कर्जासाठी नियमावली केली आहे. मात्र मोदी, चोक्सी, मल्ल्या बिनधास्तपणे बँकांना लुबाडत आहेत. मंत्र्यांनी घोटाळे करून धुडगूस घातला आहे.   मंत्रालयाला नेट लावले; पण संपूर्ण महाराष्ट्राचे काय, असा सवाल करून  मंत्र्यांनी कर्ज सेटलमेंटच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची कर्जमाफी लाटल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. ते गारगोटी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल सभेत बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. शशिकांत शिंदे, चित्राताई वाघ प्रमुख उपस्थित होते. 

पवार म्हणाले, सरकारमध्ये असलेले दोन नंबरचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काय प्रश्‍न सोडविले?  पदवीधरांसाठी काय केले?  त्यांचे फिरणे बंद करा, त्याशिवाय ते वठणीवर यायचे नाहीत. आम्ही चुकलो तर असा सल्ला दिला.  चार वर्षांत शेतीमालाला आधारभूत किंमत देता आली नाही. कृषिमंत्री कोण आहे हे शेतकर्‍यांना माहीत नाही. मेक इन इंडिया, स्मार्ट सिटी, घरे देणार, तरुणांना नोकरी देणार अशा खोट्या भूलथापा देऊन जनतेला फसविल्याचा आरोपही पवार यांनी केला. आ. धनंजय मुंडे म्हणाले, नोटाबंदीत गरिबांना फसविले, कर्जमाफीत शेतकर्‍यांना फसविले, मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षणाच्या नावाखाली फसविले आहे. अच्छे दिन, काळा पैसा, महागाईच्या नावाखाली जनतेला फसविल्याचा आरोप करत  राज्य सरकारच्या मंत्र्यांनी तूर घोटाळा, भूखंड घोटाळा, औषध घोटाळा, महापुरुषांच्या फोटोत घोटाळा, चिक्की घोटाळा यासारखे अनेक घोटाळे केले आहेत. संपूर्ण सरकार भ्रष्टाचाराने बरबटले असून फसव्या सरकारला बदलण्याची गरज असल्याचे आवाहन केले. माजी आमदार के. पी. पाटील यांनी प्रास्ताविक केले.  स्वागत जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, तालुकाध्यक्ष पंडितराव केणे यांनी केले. यावेळी माजी आमदार नामदेवराव भोईटे, नविद मुश्रीफ, धैर्यशिल पाटील-कौलवकर, रणजितसिंह पाटील, धनाजीराव देसाई, मधुकर देसाई, सुनील कांबळे, विलास कांबळे, सर्जेराव देसाई, विजय आबिटकर, अजित देसाई, शरद मोरे आदी उपस्थित होते. 

15 हजारांचे कर्ज होऊ नये
पंतप्रधान मोदींनी काळ्या पैशातून प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख मिळतील, असे आश्‍वासन दिले होते, त्यामुळे सर्वांनी बँकेत खाती काढली. बँकेतील पैसे सांभाळून 
ठेवा. खात्यावर 15 हजारांचे कर्ज होऊ नये याची काळजी घ्या, असे धनंजय मुंडे यांनी सांगताच उपस्थितांत हशा पिकला.
Tags : kolhapur district, gargoti taluka, ajit pawar, ncp halabol yatra 


  •