आजरा तालुक्यातील १७ जण झाले कोरोणामुक्त; फुलांच्या वर्षावात पाठवणी

Last Updated: Jun 02 2020 3:03PM
Responsive image


आजरा : पुढारी वृत्तसेवा     

आजरा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण होते. पण, तालुक्यासाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला. आजरा येथील कोविड सेंटरमधून आज तब्बल १७ जण कोरोनामुक्त होवून घरी परतले. याशिवाय त्यांच्या संपर्कातील ११ जणांनाही रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. कोरोनाला पराभूत करणाऱ्या या सर्वांवर खासदार संजय मंडलिक आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत प्रशासनाकडून फुलांचा वर्षाव करण्यात आला.

यावेळी बोलताना खा. मंडलिक म्हणाले, आजर्‍यातील कोविड सेंटर हे चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. या ठिकाणचे प्रशासन अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, स्वयंसेवक आदींनी कोविड सेंटरमधील रुग्णांची कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे काळजी घेत त्यांना बरे करण्यासाठी धडपडपडतात. त्यांनी कुटुंबाप्रमाणे जिव्हाळा जपला असल्यानेच आजचे हे दिलासादायक चित्र पाहयला मिळत आहे असे म्हणत कोविड सेंटरमधील सर्व कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले. यावेळी कोविड सेंटरमधील रुग्णांच्या उपचाराकरिता  राबणाऱ्या सर्व यंत्रणेचा मंडलिक आणि आबिटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.      

यावेळी प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसिलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी बी. डी. वाघ,  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत सोनवणे, ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक फर्नांडीस, मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यासह अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५२ झाला असला तरी १७ जण कोरोमुक्त झाले असून उर्वरीत रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.