Sun, Mar 24, 2019 12:25होमपेज › Kolhapur › तहसीलदार, लाड्या पटकारे, योगेश पाटीलसह ६८ जण हद्दपार

तहसीलदार, लाड्या पटकारे, योगेश पाटीलसह ६८ जण हद्दपार

Published On: Sep 12 2018 1:48AM | Last Updated: Sep 12 2018 1:37AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 68 जणांना हद्दपार केले. एस. टी. गँगच्या सदस्यांसह इचलकरंजी, शहापूर येथील गुन्हेगारांचा यामध्ये समावेश आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत या गुन्हेगारांचे फलक लावण्यात आल्याचे  पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. 

शहरातील राजारामपुरी, शाहूपुरी, जुना राजवाडा, लक्ष्मीपुरीसह इचलकरंजी, शहापूर, कुरूंदवाड, शिवाजीनगर येथील गुन्हेगारांचा यात समावेश आहे. स्वप्निल तहसीलदारसह योगेश पाटील (रा. मंगळवार पेठ), नागेश गुंडाप्पा डोलारे (राजेंद्रनगर), चिन्या ऊर्फ संदीप अजित हळदकर (दौलतनगर), अजय अनिल पाथरवट (सायबर चौक), रणजित दिलीप इंगवले (देवणे कॉलनी), सज्जनसिंग धम्मलसिंग बाबरी (विचारेमाळ), कैलास नारायण जगदणे (राजेंद्रनगर), विठ्ठल काशिनाथ सुतार, तुषार शिवाजी डवरी, संजय ऊर्फ माया महावीर किरणगे (तिघेही रा. विक्रमनगर), राकेश किरण कारंडे (शास्त्रीनगर), रामचंद्र विलास सावरे (गणेशनगर, शिंगणापूर), गौरव अशोक भालकर (सम्राटनगर), ओंकार विनायक आरगे (शास्त्रीनगर), नितीन अर्जुन लोखंडे (सम्राटनगर), नीलेश सुनील कांबळे (दौलतनगर), अक्षय ऊर्फ चिक्या अमर भोसले, भरत अभिमन्यू कुरणे (दोघे रा. रमणमळा), सुधीर बाळू शिंगे, तुषार तानाजी नाईकनवरे, बंडू भागवत जगताप, संदीप भीमराव कांबळे (सर्व रा. विचारेमाळ), राजू शिवाजी जाधव (कनाननगर), नीलेश राजू वाघमारे, राहुल राजू वाघमारे (दोघे रा. सदरबाजार), धीरश रमेश वालवलकर (शिवाजी पार्क), संजय ऊर्फ लाड्या यशवंत पटकारे, सागर आनंदराव कारंडे, दत्तात्रय धोंडिराम पाटील (बागल चौक), अमित व नीलेश संजय खेतरे, साईराज शशिकांत पाटील, तुषार संजय चव्हाण, ओंकार शशिकांत पाटील  (सर्व रा. शाहूपुरी 4 थी गल्‍ली), रितेश दीपक पाटील (रा. साईक्स एक्स्टेन्शन), बंडा ऊर्फ विश्‍वास लोंढे (विचारेमाळ), रियाज अन्वर सय्यद (शाहू कॉलेजजवळ, विचारेमाळ), राकेश शामराव भोसले (कसबा बावडा), अर्जुन चंद्रकात पोवार (कावळा नाका), प्रवीण प्रकाश वडीयार, नीलेश आनंदा बनसोडे (सदरबाजार), राहुल दगडू धनवडे (विचारेमाळ), संजय बळीराम कांबळे (कसबा बावडा), हसन रफीक शेख (यादवनगर), अमित व चेतन सुरेश दिडे (दौलतनगर), रोहित परशुराम कुर्‍हाडे (दौलतनगर), सुरज तानाजी नलवडे (दत्तवाडकर गल्‍ली), आसू बादशाह शेख (दौलतनगर), फिरोज यासिन मुल्‍ला (यादवनगर), लखन मोहन कांबळे (शाहू कॉलनी, विक्रमनगर), गुरुदत्त शांतीनाथ पोळ (जवाहरनगर), युवराज ऊर्फ बाळू शिवाजी पताडे (इचलकरंजी), प्रदीप शिवाजी कांबळे (सहकारनगर, हातकणगंले), माजीत अल्‍लाउद्दीन मुल्‍ला (माळभाग, कबनूर), संतोष मोहन कांबळे (राजापूर, शिरोळ), अनिल ऊर्फ पिंटू प्रल्हाद मोरे (कोरोची), विकी ऊर्फ विकास लक्ष्मण जावळे (इचलकरंजी), संतोष काशीनाथ जाधव (गोसावी गल्‍ली, इचलकरंजी), प्रवीण प्रकाश दावणे (कबनूर), सुशांत रणजित हजारे ऊर्फ रजपूत (तारदाळ, हातकणंगले), नितीन महादेव लंगोटे (दत्तनगर, कबनूर), मुजम्मील खुदबुद्दीन कुरणे (यादवनगर), ज्ञानदेव रामा खोंदले (सावरेवाडी, शाहूवाडी), अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याठिकाणी झळकले फलक :

 राजवाडा पोलिस ठाणे : बिंदू चौक, क्रशर चौक
 लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे : लक्षतीर्थ वसाहत, शुक्रवार पेठ, गंगावेेेेेश, रविवार पेठ
 शाहूपुरी पोलिस ठाणे : व्हीनस कॉर्नर, सीबीएस परिसर, सदर बाजार, रुईकर कॉलनी, कावळा नाका
 राजारामपुरी पोलिस ठाणे : सायबर चौक, तीनबत्ती चौक, जवाहरनगर, राजेंद्रनगर, विक्रमनगर