Mon, Jun 24, 2019 17:10होमपेज › Kolhapur › उदगाव अपघातातील जखमी बालिकेचा मृत्यू

उदगाव अपघातातील जखमी बालिकेचा मृत्यू

Published On: Mar 06 2018 6:57PM | Last Updated: Mar 06 2018 6:57PMजयसिंगपूर : प्रतिनिधी

जयसिंगपूर-उदगाव मार्गावर रेल्वे ब्रिजजवळ मंगळवारी मोपेड आणि रुग्णवाहिका यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली होती. अपघातातील गंभीर जखमी  सेजल अरूण ठाकूर (वय ३,रा.कबनूर) या बालिकेचे सांगली सिव्हिलमध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे निधन झाले.  

या अपघातात  रुग्णवाहिका  आणि मोपेडचे मोठे नुकसान झाले आहे. मोपेडच्या चक्काचूर झाला आहे. चक्काचूर झाला तर रुग्णवाहिकेची समोरील काच फुटली. मोपेडस्वार अमर नारायणसिंग ठाकूर यांचा उजवा पाय मोडला असून, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दोघे सांगलीहून  इचलकरंजीला जात होते तर जयसिंगपूर येथील लीलावती  हॉस्पिटलची रुग्णवाहिका सांगलीला जात होती. रुग्णवाहिकेचा चालक कृष्णकांत उंडाळे(वय३८,रा.झेले हायस्कूलसमोर जयसिंगपूर) याने पोलिसांत फिर्याद दिली आहे.