Fri, Apr 26, 2019 09:27होमपेज › Kolhapur › कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर भीषण अपघात ६ ठार 

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर भीषण अपघात ६ ठार 

Published On: Jan 26 2018 2:58PM | Last Updated: Jan 26 2018 2:58PMकोल्‍हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंब्यांनजीक झालेल्‍या भीषण अपघातात दोन लहान मुलांसह ६ जण ठार झाले आहेत तर, २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मृत पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसर येथील असल्‍याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

गणपतीपुळ्याला जात असताना आंबा-तळवडे जवळ कार झाडावर आदळल्‍याने हा अपघात झाला. अपघातानंर कारमधील ५ जण जागीच ठार झाले तर, उपचार सुरु असताना एकाचा मृत्‍यू झाला.