Thu, Feb 21, 2019 13:15



होमपेज › Kolhapur › कोल्हापूर अपघात; अजिंक्य रहाणेच्या वडिलांना जामीन

कोल्हापूर अपघात; अजिंक्य रहाणेच्या वडिलांना जामीन

Published On: Dec 15 2017 9:23AM | Last Updated: Dec 15 2017 6:14PM

बुकमार्क करा





कागल : प्रतिनिधी

कागल बस स्थानका शेजारील जोड पुलाजवळ महामार्ग ओलांडताना लक्ष्मीबाई दादासाहेब कांबळे (वय ६७, रा. इचलकरंजी) या महिलेचा गुरुवारी सकाळी कारच्या जोरदार धडकेत अपघाती मृत्यू झाला. कारमध्ये क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेचे वडील मधूकर रहाणे व कुटुंबीय होते. मधुकर रहाणेच गाडी चालवत होते, असे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले होते. याप्रकरणी मधूकर रहाणे यांना अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

निपाणीकडे जाणार्‍या कारने (एमएच - 03 - सीबी 2021)जोराची धडक दिल्याने वृद्ध महिला रस्त्यावर आपटून त्यांना जोराचा मार बसला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना कोल्हापुरात सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची नोंद कागल पोलिसात झाली आहे.