Wed, Jan 23, 2019 10:38होमपेज › Kolhapur › चुलत्याच्या रक्षाविसर्जनला येणारा पुतण्या अपघातात ठार

चुलत्याच्या रक्षाविसर्जनला येणारा पुतण्या अपघातात ठार

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 12:17AM

बुकमार्क करा
आजरा : प्रतिनिधी

एरंडोळ (ता. आजरा) येथील विश्राम सोनबा नाईक (वय 75) यांच्या रक्षाविसर्जनासाठी मुंबई येथून मारुती इर्टिका कारने येत असताना किणी टोल नाक्याजवळ कारचा टायर फुटून गाडी उलटल्याने पुतण्या आनंदा दत्तू नाईक (40, रा. मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात इतर सहाजण जखमी झाले असून, या घटनेमुळे एरंडोळ गावावर शोककळा पसरली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, विश्राम नाईक यांचे शुक्रवारी (दि. 12) पहाटे निधन झाले. निधनाचे वृत्त नाईक यांचा पुतण्या आनंदा व मुंबई येथील नातेवाइकांना कळविण्यात आले. आज, शनिवारी (दि. 13)सकाळी रक्षाविसर्जनचा कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमासाठी आनंदा नाईक, बाळू ज्योतिबा चौगुले, भरमू हरी नाईक, जयसिंग विश्राम हातकर यांच्यासह सातजण शुक्रवारी सायंकाळी इर्टिका कारने एरंडोळच्या दिशेने निघाले. येत असताना पहाटे पावणेपाचच्या सुमारास इस्लामपूरच्या हद्दीत किणी टोल नाक्याजवळ भरधाव कारचा पुढचा टायर फुटल्याने गाडी उलटून त्यामध्ये आनंदा यांचा मृत्यू झाला. तर बाळू ज्योतिबा चौगुले (रा. मेंढोली), भरमू हरी नाईक (रा. एरंडोळ) हे गंभीर जखमी झाले आहेत.

हे वृत्त एरंडोळ गावात समजताच एरंडोळसह पोळगाव व पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. रात्री उशिरा नाईक यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नाईक यांच्या पश्‍चात तीन मुली, पत्नी, मुलगा, आई, वडील असा परिवार आहे.