Sat, Jul 20, 2019 15:03होमपेज › Kolhapur › स्ट्रॉम वॉटरचा निधी जाणार परत

स्ट्रॉम वॉटरचा निधी जाणार परत

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 22 2018 10:54PMकोल्हापूर : प्रतिनिधी

देवकर पाणंद येथे स्ट्रॉम वॉटरचे काम होणार का नाही. गेल्या पाहणीवेळी स्ट्रॉम वॉटरचे काम करून घेतो, असे सांगितले होते. चार दिवसांपूर्वीच्या पावसात लोकांच्या घरात पाणी गेले. शासनाने स्ट्रॉम वॉटरचा निधी परत मागितला आहे हे खरे आहे काय? निधी परत जाणार असेल तर मनपा निधीतून काम पूर्ण करा, अशी मागणी सदस्यांनी केली. प्रशासनाच्या वतीने राज्यस्तरीय नगरोत्थानमधून काम प्रस्तावित केले होते. शासनाने हा प्रोजेक्ट गुंडाळून करून पैसे जमा करण्यासाठी कळविले आहे. शासनास पत्रव्यवहार करून पैसे थांबविण्यासाठी प्रयत्न करू, असे स्पष्ट करण्यात आले. व्हीयुबीची अपूर्ण कामे करण्यासाठी शॉर्ट टेंडरची फाईल 14 दिवस आयुक्‍त कार्यालयात आहे. सहीसाठी इतके दिवस लागतात का? गेल्या पावसाळ्यापूर्वी टेंडर काढावयाचे होते, अशी विचारणा सदस्यांनी केली. प्रशासनाच्या वतीने टेंडरसाठी प्रस्ताव सादर केला आहे. रिस्क अ‍ॅण्ड कॉस्टवर आधारित कामे प्रस्तावित केली आहे. स्ट्रॉम वॉटरचे पैसे परत करा, असे पत्र शासनाकडून आले आहे. स्ट्रॉमवॉटरसाठी 70.93 कोटींचा डीपीआर केला होता. यापैकी 15.87 कोटी मनपाचा हिस्सा आहे. आतापर्यंत 51.40 कोटी खर्च झाला आहे, असे स्पष्ट करण्यात आले.  

सभापती आशिष ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सत्यजित कदम, कविता माने, प्रतिज्ञा निल्ले, संदिप नेजदार, राहूल माने, संजय मोहिते, सविता घोरपडे, गिता गुरव आदींनी चर्चेत भाग घेतला. 53 ओपनस्पेसला महापालिकेचे नावशहरात बर्‍याच ठिकाणी पाणी पुरवठा विभागाकडून पाईप लाईन, ड्रेनेज लाईन व इतर कारणासाठी रस्ता खुदाई केली जात आहे. याची पवडी विभागाला माहिती नसते. नवीन रस्ता उकरावा लागतो. सर्व विभागात समन्वय हवा, अशी सूचना सदस्यांनी केली. प्रशासनाच्यावतीने पवडी विभागाकडून नवीन रस्ता करण्यापुर्वी सर्व संबधीत विभागास कळविण्यात येते, असे सांगण्यात आले.   शहरातील ओपनस्पेस जागेला महापालिकेचे नांव लागले का? अशी विचारणा सदस्यांनी केली.

प्रशासनाच्यावतीने 53 ठिकाणच्या जागेला मनपाचे नांव लागले आहे. 188 जागा आहेत. यातील इनामी जमिन व इतर कारणाने नांव लागण्याचे काम प्रलंबित आहे. सदरची कार्यवाही तहसिलदार कार्यालयाकडे सुरु आहे, असे स्पष्ट करण्यात आले. शहरात 40 ठिकाणी पाण्याची गळतीजरगनगर भागातील गळतीबाबत वारंवार सांगूनही गळती काढलेली नाही. वर्षभरात पाणी गळतीचा खर्च काढल्यास त्यापेक्षाही कमी गळती काढण्याचा खर्च आहे. वारंवार सदस्यांनी सांगूनही गळती काढली जात नाही. 5 मोठया पाईपमधील गळतीतून 9 एमएलडी पाणी वाहते. अधिकारी सभागृहात खोटी माहिती देतात. गळती काढल्यास पाणी वाचून पैशाचीही बचत होईल. तुम्ही नियोजन करा. प्रत्येक महिन्याला टार्गेट ठेवा. टप्याटप्याने संपुर्ण गळती काढा. एखादा सेल फक्त गळती काढण्यासाठी ठेवा. वर्षभरात बर्‍याच पैशाची व पाण्याची बचत होईल, असे सदस्यांनी सांगितले. प्रशासनाच्यावतीने 40 ठिकाणी गळती आहेत. सर्व्हेनुसार 7 ते 8 एमएलडी पाणी वाया जाते. गळती काढण्याचे नियोजन करु, असे स्पष्ट करण्यात आले. 

 कचर्‍यासाठी फुटलेले कंटेनर

कंटेनर फुटलेले आहेत. 2 महिने झाले दुरुस्तीला देवून अजून परत मिळालेले नाहीत. रिपेअरींगचे नियोजन केलेले नाही. वर्कशॉपमध्ये बराच अनागोंदी कारभार सुरु आहे. त्यासाठी त्याठिकाणी सीसीटीव्ही लावा. त्याचे थेट प्रेक्षपण आयुक्त, महापौर व स्थायी समिती सभापती यांच्या कार्यालयात ठेवा, अशी सूचना सदस्यांनी केली. प्रशासनाच्यावतीने कंटेनर दुरुस्तीचे काम सुरु आहे. 50 टक्केपेक्षा जास्त खराब झालेत त्यासाठी खर्च जास्त येतो. दिड दिवस कंटेनर दुरुस्तीसाठी लागतो. जास्त खराब असल्यास वेळ लागतो, असे स्पष्ट करण्यात आले.

 Tags :