Thu, Apr 25, 2019 16:23होमपेज › Kolhapur › शेतकर्‍यांनो शेती कधीही विकू नका : चंद्रदीप नरके

शेतकर्‍यांनो शेती कधीही विकू नका : चंद्रदीप नरके

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कृषिप्रधान महाराष्ट्रात शेतकर्‍यांची संख्या झपाट्याने घटत आहे. नागरीकरण दुप्पट वेगाने वाढत आहे. त्यासाठी पिकाऊ शेतजमिनी विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर घेतल्या जात आहेत. शेती विकणार्‍यांकडे पैसा टिकत नाही; पण पैशाच्या मोहापायी शेतकरी कवडीमोल दराने शेती विकू लागला असून शहरातील विशिष्ट समाज शेती विकत घेण्यासाठी पुढे येत आहे. हे भयावह असून भविष्यात शेतीत क्रांती होणार असल्याने कुणीही शेती विकू नये, असे कळकळीचे आवाहन आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. पुरस्कारप्राप्‍त शेतकर्‍यांनीच शेती टिकावी, पिकावी यासाठी पुढाकार घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागातर्फे बळीराजा पुरस्कार, पीकस्पर्धा विजेते शेतकरी गौरव आणि आदर्श गोठा पुरस्कारप्राप्‍त शेतकरी सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष शौमिका महाडिक होत्या. कृषी सभापती उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस.एच.शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आमदार नरके म्हणाले, पुरस्कार प्राप्‍त शेतकर्‍यांकडे पुस्तकापेक्षा प्रत्यक्षातील ज्ञान जास्त असल्याने त्याचा उत्पादकता वाढवण्यासाठी उपयोग करून घ्यावा. आदर्श शेतकर्‍यांवर ज्या त्या भागाची जबाबदारी सोपवा. आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने बाजारात सोयाबीन, भाताची खरेदी होते, हे वास्तव असल्याने आधारभूत किंमत व प्रत्यक्षात बाजारभाव यात येणारी तफावत अनुदान स्वरूपात सरकारने सोसावी, असेही नरके यांनी सुचवले. 

आमदारांनी टोचले कान

दोन वर्षांच्या बळीराजा पुरस्काराचे वितरण एकाच वेळी झाल्याबद्दल आमदार चंद्रदीप नरके यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये कान टोचले. कृषी सभापती आमच्याच पक्षाचा, तरीही एवढी दिरंगाई का, दरवर्षी कार्यक्रम घ्या, तुम्हाला कुणी अडवलंय का, जोरात काम करून दाखवा, असे सांगत उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांना चिमटा काढला. 

बळीराजा पुरस्कारप्राप्‍त शेतकरी असे -

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ व कृषिमित्र पुरस्कार : दादासो पाटील (सरूड ता. शाहूवाडी), कृष्णात धनगर (घुणकी ता. हातकणंगले), धोंडिराम कतगर (सुळकूड ता. कागल), सचिन लाड (सरवडे ता. राधानगरी), राणिता चौगुले (कोल्हापूर), तानाजी मोरे (कोगे ता. करवीर), रंगराव पाटील (कोलोली ता. पन्हाळा). 

जिजामाता कृषिभूषण पुरस्कार : आनंदी चौगले (पोहाळे तर्फ आळते ता. पन्हाळा), उज्ज्वला कोपार्डे (आरे.ता. करवीर)

भातपीक स्पर्धा विजेते : चंद्रकांत चव्हाण (गारगोटी ता. भुदरगड), कलगोंडा पर्वते व मलगोंडा टेळे (सुळकूड ता. कागल), साताप्पा पाटील (चंद्रे ता. राधानगरी), महादेव कुंभार (आकुर्डे ता. भुदरगड), तानाजी पाटील (येळवडे ता. राधानगरी), सदाशिव माने (कसबा सांगाव ता. कागल), कृष्णात जरग (म्हसवे ता. भुदरगड), नागोजी पाटील (कालकुंद्री ता. चंदगड), सूर्यकांत दोरूगडे (साळगाव ता. आजरा), संपतराव खोत (रणदिवेवाडी ता. कागल), आप्पासो किणींगे (मुरकुटे ता. भुदरगड), अशोक देसाई (शेळोली ता. भुदरगड). सोयाबीन पीक स्पर्धा विजेते : मधुकर तेलवेकर (पिंपळगाव ता. कागल), प्रमोद चौगुले (गडमुडशिंगी ता. करवीर), तात्यासो चौगले (इस्पुर्ली ता. करवीर), मारुती पाटील (नागाव ता. करवीर), दादासो पाटील (उचगाव ता. करवीर), क्रांतिसिंह पाटील (बाचणी ता. करवीर), संतोष शेळके (आळते ता. हातकणंगले).

 

Tags : kolhapur, kolhapur news, kolhapur zp, Baliaraja Award, felicitation ceremony,


  •