होमपेज › Kolhapur › तरुणाईने लुटला ‘जश्‍न-ए-इश्का’चा आनंद

तरुणाईने लुटला ‘जश्‍न-ए-इश्का’चा आनंद

Published On: Feb 16 2018 1:52AM | Last Updated: Feb 16 2018 12:07AMकोल्हापूर : प्रतिनिधी

बुधवारची ‘व्हॅलेंटाईन डे’ची सायंकाळ तरुणाईसाठी खास बनली. रॉक बँडवर सुमधूर वाजणारी हिंदी-इंग्रजी गाणी, विविध स्पॉट गेम्स आणि सोबतीला तरुणाईचा जल्लोष अशा गुलाबी आणि उत्साही वातावरणाचा आनंद उपस्थितांनी लुटला. निमित्त होते 94.3 टॉमॅटो एफ. एम. तर्फे आयोजित ‘जश्‍न-ए-इश्का’ या बहारदार कार्यक्रमाचे. या कार्यक्रमासाठी मुख्य प्रायोजक म्हणून साई सर्व्हिस आणि व्हेन्यू पार्टनर म्हणून डीवायपी सिटी यांचे सहकार्य लाभले.

‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधून डीवायपी सिटी मॉलमध्ये बुधवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला तरुणाईसह कुटुंबीयांची हाऊसफुल्ल गर्दी झाली होती. तरुणाईने कार्यक्रमात धमाल उडवली. बँड इंटिग्रेटेड लीगसी हा रॉक बँड सर्वांचे आकर्षण ठरले. या ब्रँडमधील कलाकारांनी फितूर, ये काली काली आँखे, बिल्डिंग इन द शॉकोज, गुलाबी आँखे, दिल से रे आदी अवीट गाणी सादर करून वाहवा मिळवली. अनेक गाण्यांना ‘वन्स मोअर’देखील मिळाला.

या ठिकाणी टॉमॅटो एफ. एम. च्या आर.जें.नी सर्वांसाठी कपल गेम्स, टॅटोज, फ्लॅश मॉब आणि सेल्फी कॉन्टेस्ट घेतली. यामध्ये तरुणाईने प्रेमाचा डायलॉग, गाणी आणि कविता सादर करून प्रेमाचा इझहार व्यक्त केला. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. मॉलचा संपूर्ण परिसर गुलाबी फुग्यांनी सजविलेला होता. एकदम खासमखास वातावरणात तरुणाईनेही आनंदाची पर्वणी साधली.