Fri, Jul 19, 2019 01:20होमपेज › Kolhapur › सेल्फी काढत असताना युवक बंधार्‍यात बुडाला

सेल्फी काढत असताना युवक बंधार्‍यात बुडाला

Published On: Jan 02 2018 1:32AM | Last Updated: Jan 02 2018 1:06AM

बुकमार्क करा
मलकापूर : वार्ताहर

पेरीड (ता. शाहूवाडी) येथील बंधार्‍यावर सेल्फी काढत असताना युवक पाण्यात बुडाला. रामबहादूर अशोक देशमुख (वय 20, रा. हळीहाळ, ता. हळीहाळ, जि. कारवार) असे या युवकाचे नाव आहे. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.सोमवारी दिवसभर त्याचा शोध घेण्यात आला. सायंकाळनंतर ही शोधमोहीम थांबविण्यात आली. 

1 जानेवारी रोजी सकाळी पेरीड येथील मलकापूर जवळील कडवी नदीवर रामबहादूर देशमुख मित्रांसमवेत आंघोळीसाठी गेला होता. आंघोळ करण्यापूर्वी जवळच असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यावर उभा राहून सेल्फी काढत असताना तोल जाऊन पाण्यात पडला. पोहता येत नसल्यामुळे तो  बुडाला.  

सोबत  असणारा त्याचा चुलत भाऊ रमेश  गुरखा व  सहकार्‍यांनी आरडाओरड केली; परंतु कोणीच मदतीला धावून आले नाही.  जीवरक्षक दिनकर कांबळे यांना बोलवून नदीपात्रात त्याचा शोध घेतला. मात्र, तो हाती लागला नाही. तो मलकापूर येथे सेंट्रिंग कामासाठी आला होता.