Tue, Mar 19, 2019 09:37होमपेज › Kolhapur › ‘आपली गल्ली’ 44 वर्षांनंतर एकवटली

‘आपली गल्ली’ 44 वर्षांनंतर एकवटली

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 22 2018 11:32PMकोल्हापूर : प्रतिनिधी

पोटची खळगी भरण्यासाठी प्रत्येकाला आपल्या कुटुंबासह भटकंती करावी लागते. नोकरी-उद्योग-व्यवसायाच्या उद्देशाने स्वत:चे गाव-घर सोडून परजिल्हा-राज्य-देशात जावे लागते. मात्र, प्रत्येकालाचा आपल्या जन्मभूमीची आठवण आवर्जून असतेच. अशा या ओढीतूनच एकत्र राहत असणारी इचलकरंजीतील ‘आपली गल्ली’ एकवटली. तब्बल 44 वर्षांनंतर गल्लीवाले एकमेकांना भेटले आणि त्यांचा अनोखा स्नेहमेळावा झाला. 

इचलकरंजीतील राम-जानकी हॉलमध्ये मेळाव्याच्या सुरुवातील कालओघात निधन पावलेल्या व्यक्‍तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर उपस्थित असणार्‍या प्रत्येकाने आपली ओळख करून दिली. संपूर्ण नाव, तत्कालीन गल्लीतील टोपण नाव असा इत्थंभूत परिचय करून दिला. यानंतर जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. जुन्या गल्लीत एकत्रीत फेरफटकाही मारण्यात आला. यावेळी गल्लीतील झालेल्या बदलांबाबत चर्चाही झाली. संयोजन विकास मोघे, किरण मिराशी, जीवन नातू, नुतन फाटक, सुरेश वैद्य, माया कुलकर्णी, छाया कुलकर्णी, दत्तात्रय पुसाळकर, अनिल कुलकर्णी आदींनी केले.