Mon, Aug 19, 2019 09:06होमपेज › Kolhapur › हमीभावापेक्षा कमी दर दिल्यास वर्षाची कैद

हमीभावापेक्षा कमी दर दिल्यास वर्षाची कैद

Published On: Aug 24 2018 12:44AM | Last Updated: Aug 24 2018 12:00AMकोल्हापूर : प्रतिनिधी

केंद्र सरकारने यावर्षीच्या हंगामासाठी विविध पिकांचा हमीभाव कायद्याने निश्‍चित केला असून या हमीभावापेक्षा कमी दराने पीक खरेदी करणाऱयांना या कायद्याने एक वर्ष शिक्षा व 50 हजार रुपये दंडाची कारवाई होऊ शकते, त्यामुळे शेतकर्‍यांनी निश्‍चित केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने आपला शेतमाल विकू नये, असे आवाहन कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे. 

व्यापार्‍यांनीही शेतमालाची खरेदी हमीभावापेक्षा कमी दराने करू नये. ठरलेल्या दरापेक्षा कमी दराने जे व्यापारी शेतमाल खरेदी करतील त्यांच्यावर यापुढे गुन्हा दाखल करण्यात येईल. यासंदर्भात शेतक़र्‍यांनी बाजार समितीकडे तक्रार करावी, असेही बाजार समितीने यासंदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

हमीभाव असा (दर प्रतिक्िंवटल रुपयांत)

भात 1750 व 1770, ज्वारी 2430 व 2450, बाजरी 1950, मका 1700, नाचणी (रागी)2897, तूर 5675, मूग 6975, उडीद 5600, कापूस  5150 व  5450,  भुईमूग 4890, सुर्यफूल  5388, सोयाबीन 3399, तीळ 6249, कारळे 5877.