होमपेज › Kolhapur › आजी-माजी अध्यक्षांची गावे यशवंत पुरस्काराची मानकरी

आजी-माजी अध्यक्षांची गावे यशवंत पुरस्काराची मानकरी

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 15 2018 1:01AMकोल्हापूर : प्रतिनिधी

ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवकांसाठीच्या 2016-17 आणि  2017-18 या दोन वर्षांसाठीच्या यशवंत पुरस्कारांची बुधवारी एकत्रित घोषणा करण्यात आली. यात विद्यमान अध्यक्ष शौमिका महाडिक यांचे पुलाची शिरोली हे गाव तर माजी अध्यक्ष उमेश आपटे यांचे उत्तूर  गाव जिल्हास्तरावर प्रथम आले आहे. कागल तालुक्यातील खडकेवाडा ग्रामपंचायतीला यंदाचा प्रथम पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. यांना प्रत्येकी 50 हजाराचे बक्षीस असणार आहे. पुरस्कार वितरण शनिवारी 17 फेब्रुवारीला दुपारी शाहू मार्केट यार्ड सांस्कृतिक मंदिरात विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी व आदर्श गाव संकल्पनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते होणार आहे. 

जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून 2004 पासून यशवंत पुरस्कार दिले जातात. तालुका आणि जिल्हास्तरावर मूल्यमापन होऊन दोन विभागात क्रमांक काढले जातात. तालुक्यातून प्रथम येणार्‍या ग्रामपंचायतीस 25 हजार, दुसर्‍या क्रमांक 15 हजार  तसेच सरपंचांना 1 हजार रुपये वैयक्तिक बक्षीस दिले जाते. तालुक्यातून प्रथम आलेल्यांतून जिल्हास्तरावरील ग्रामपंचायतीचा क्रमांक काढला जातो. पहिल्या क्रमांकास 50 हजार, दुसर्‍या क्रमांकास 30 हजार असे बक्षीस असते. ग्रामसेवकांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवले जाते. 

जिल्हास्तरीय यशवंत पुरस्कारात 2017 साली लाटगाव (ता. आजरा) तर 2018 सालासाठी ग्रामपंचायत बेले (ता. करवीर) यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. 23 जणांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कारही जाहीर झाले आहेत. तालुकास्तरावर आदर्श ग्रामपंचायत म्हणून 2017 सालासाठी 23 तर 2018 साली 24 ग्रामपंचायतींना गौरवण्यात येणार आहे. 

2017 विजेते ग्रामसेवक
संदीप चौगले (देवर्डे), दत्तात्रय माने (मडिलगे खुर्द), अमृत देसाई (हलकर्णी), संदीप धनवडे (लिंगनूर), अमित पाटील (वेतवडे), निवृत्ती कुंभार (कौलगे), संदीप तेली (वरणगे), आनंदा तळेकर (कुशिरे), रमेश तायशेटे (ओलवण), जमीर आरकाटे (मौजे मजरेवाडी), भास्कर भोसले (कांडवण). 

2018 चे विजेते ग्रामसेवक
रणजित पाटील (लाटगाव), अनिमा इंदुलकर (मेघोली), जनाबाई जाधव (उमगाव), प्रमोद जगताप (खमलेट्टी), पांडुरंग मेंगाणे (असंडोली), संतोष चव्हाण (भेंडवडे), सागर पार्टे (सोनाळी), राजेंद्र गाडवे (गडमुडशिंगी), कृष्णात पोवार (कोळीक), लक्ष्मण इंगळे (तारळे खुर्द), भाग्यश्री केदार (चिंचवाड), सुनील सुतार (नांदगाव). 


2017 यशवंत ग्राम तालुकास्तर प्रथम व द्वितीय पुरस्कार
लाटगाव व पेद्रेवाडी (ता. आजरा), वेसर्डे व असळज (ता. गगनबावडा), डेळे चिवाळे व नवले (ता. भुदरगड), ऐनापूर व करंबळी (ता. गडहिंग्लज), अलबादेवी व इब्राहिमपूर (ता. चंदगड), शिरोली पु. व किणी (ता. हातकणंगले), कुडित्रे व दोनवडे (ता. करवीर), तमनाकवाडा व बाळेघोल (ता. कागल), कळे व कुशिरे (ता. पन्हाळाल, माजगाव व शेळेवाडी (ता. राधानगरी), कोंडिग्रे व हसूर (ता. शिरोळ), बांबवडे (ता. शाहूवाडी).

2018 चे यशवंत ग्राम तालुकास्तर प्रथम व द्वितीय पुरस्कार
उत्तूर व वेळवट्टी (ता. आजरा), असंडोली व तळीये बुद्रुक (ता. गगनबावडा), पाळ्याचा हुडा व राणेवाडी (ता. भुदरगड), हेब्बाळ व शिप्पूर तर्फ नेसरी (ता. गडहिंग्लज), नागनवाडी व मुरकुटेवाडी (ता. चंदगड), पट्टणकोडोली व चावरे (ता. हातकणंगले), बेले व भुयेवाडी (ता. करवीर), खडकेवाडा व गोरंबे (ता. कागल), पोर्ले तर्फ ठाणे व कसबा कोडोली (ता. पन्हाळा), घोटवडे व तळाशी (ता. राधानगरी), मौजे घोसरवाड व बस्तवाड (ता. शिरोळ), आकुर्ळे व भेडसगाव (ता. शाहूवाडी).