Wed, Nov 14, 2018 23:01होमपेज › Kolhapur › यमी सूप्स आणि क्रीस्पी स्टार्टर...

यमी सूप्स आणि क्रीस्पी स्टार्टर...

Published On: Feb 12 2018 1:52AM | Last Updated: Feb 11 2018 11:40PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

हॉटेलप्रमाणे सूप्स आणि स्टार्टर आपण घरी बनवणे सहज शक्य होत नाही; पण जर आपण हे स्टार्टर आणि सूप कसे बनवायचे हे जर तज्ज्ञांकडून जाणून घेतले तर मात्र काहीच अशक्य नाही. अगदी हॉटेलप्रमाणे सूप आणि स्टार्टर बनवून आपल्या मुलांसह कुटुंबीयांना त्याची चव चाखण्याची संधी देणे शक्य होते. हेच जाणून दैनिक ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने कस्तुरी सभासदांसाठी पुन्हा एक हटके रेसपी वर्कशॉपचे आयोजन केले होते. हॉटेल केट्री च्या नामवंत शेफकडून कस्तुरी सभासदांना आज सूप आणि स्टार्टरचे प्रशिक्षण देण्यात आले. 

या वर्कशॉपमध्ये सभासदांना बटन मशरूम सूप, थाई जिंजर सूप, लेमन कोरिएंडर सूप, व्हेज माँचाव सूप सह अन्य व  स्टार्टरमध्ये बेबीकॉर्न स्टिक, थाई स्प्रिंग रोल, शांघाई पनीर, व्हेज फ्राईड वॉनटनसह अनेक प्रकारचे स्टार्टर शिकवण्यात आले. केवळ कस्तुरी सभासदच नाही तर अनेक महिला व मुली वर्कशॉपमध्ये सहभागी झाल्या होत्या. विविध प्रकारचे सूप आणि स्टार्टर शिकण्याची संधी मिळाल्याने महिला सभासदांनी समाधान व्यक्त केले. वर्कशॉपध्ये सहभागी महिलांना रेसपी नोटस् देण्यात आल्या.  शिवाय हॉटेल केट्रीच्या शेफनी उपस्थित महिलांना अनेक उपयुक्त टीप्सही दिल्या.