Sat, Jul 04, 2020 14:47होमपेज › Kolhapur › ज्येष्ठ लेखिका प्रा. अनुराधा गुरव यांचे निधन

ज्येष्ठ लेखिका प्रा. अनुराधा गुरव यांचे निधन

Last Updated: May 30 2020 9:58PM

प्रा. अनुराधा गुरवकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

गेली पाच दशके साहित्यात मुशाफिरी करणाऱ्या येथील ज्येष्ठ लेखिका प्रा. अनुराधा गुरव (वय ७८) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात आले. 

२०१७ मध्ये त्यांचा अमृत महोत्सवी सत्कार येथील विविध संस्थातर्फे झाला होता. 'प्रा अनुराधा गुरव व्यक्ती आणि वाङ्‌मय' या नावाचा गौरव ग्रंथही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित झाला होता. त्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या सभासद होत्या.