Sat, Nov 17, 2018 21:19



होमपेज › Kolhapur › वारणेत आज कुस्ती महासंग्राम

वारणेत आज कुस्ती महासंग्राम

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 13 2017 12:37AM

बुकमार्क करा





वारणानगर : प्रतिनिधी

सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यस्मरणार्थ बुधवारी (दि. 13) वारणानगर येथे कुस्ती महासंग्राम होत आहे. प्रथम क्रमांकाच्या ‘जनसुराज्यशक्ती श्री’ किताबासाठी हिंदकेसरी जास्सा पट्टी (पिद्दी आखाडा) व हिंदकेसरी कृष्णकुमार (सोनीपत) यांच्यात लढत होणार आहे. वारणा विद्यालयाच्या पटांगणावर खास तयार करण्यात आलेल्या कुस्ती मैदानाची पाहणी सायंकाळी डॉ. विनय कोरे यांनी केली. स्व.तात्यासाहेब कोरे कुस्ती समितीचे अध्यक्ष निपुण कोरे व वारणा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव पाटील, युवा नेते विश्‍वेश कोरे यांच्या हस्ते मैदान पूजनाने दुपारी एक वाजता कुस्त्यांना प्रारंभ होणार आहे.

 द्वितीय क्रमांकाची भारत केसरी साबा (पंजाब) व हिंदकेसरी जोगींदरसिंह (चांदरूप आखाडा) यांच्यात, तृतीय क्रमांकासाठी कुस्ती पुण्याचा  किरण भगत विरुद्ध दिल्लीचा अजय गुज्जर, वारणा दूध संघ शक्ती किताबासाठी  माऊली जमदाडे (कोल्हापूर) विरुद्ध उत्तर प्रदेश केसरी गोपाल यादव, वारणा ट्रॅक्टर वाहतूक शक्ती किताबासाठी महाराष्ट्र केसरी समाधान घोडके (कोल्हापूर) विरुद्ध कर्नाटक केसरी कार्तिक काटे, वारणा बँक शक्ती किताबासाठी उपभारत केसरी बाला रफीक विरुद्ध हरियाणा केसरी प्रवीण भोला, ईडीएफ मान शक्ती किताबासाठी उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार विरुद्ध राष्ट्रीय विजेता शिवराज राक्षे, शेतीपूरक शक्ती किताबासाठी कौतुक डाफळे विरुद्ध   लवप्रित, बिल्ट्यूब शक्ती किताबासाठी  योगेश बोंबाळे विरुद्ध विलास डोईफोडे, शिक्षण मंडळ शक्ती किताबासाठी गणेश जगताप विरुद्ध  संतोष दोरवड, दूध कामगार संघटना शक्ती किताबासाठी मारुती जाधव विरुद्ध विकी, संग्राम पाटील विरुद्ध विष्णू खोसे, सचिन जामदार विरुद्ध अंकीतकुमार, शिवाजी पाटील वि.अशोककुमार यांच्यात लढत होईल.