Mon, Mar 25, 2019 04:57
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › हे कोल्हापूर हाय, इथं प्रत्येक विषय हार्डच हाय!  

हे कोल्हापूर हाय, इथं प्रत्येक विषय हार्डच हाय!  

Published On: Jun 30 2018 1:01PM | Last Updated: Jun 30 2018 1:01PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

आज जागतिक सोशल मीडिया दिन. त्यानिमित्ताने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आपल्या कोल्हापुरी जोक्स बद्दल जाणून घेऊयात. कोल्हापूरची रांगडी भाषा आणि इथल्या लोकांवर नेहमीच लेख छापून येतात. मात्र, सोशल मीडियावर त्याचा रंग आणि ढंग वेगळाच असतो. अनेक बऱ्या-वाईट प्रसंगावरून गाव, शहर आणि वेगवेगळया भागातील,जोक्स व्हायरल होत असतात. तसेच कोल्हापूर या शहरावरही अनेक जोक्स व्हायरल होत असतात. या प्रत्येक जोकमधून कोल्हापुरातील व्यक्तीच्या स्वभावाची चर्चा होते. काही वेळा पुणे आणि कोल्हापुरातील दोन व्यक्तींची तुलना करणारे जोक्स व्हायरल होत असतात.  याआधी पुस्तकं, लेख भाषण यातून कोल्हापुरची माहिती सांगितली जायची. पण, आता सोशल मीडियावर  जगात भारी कोल्हापूरी आणि पूरेपूर, भरपूर आपलं कोल्हापूरच कसं भारी हाय हे सांगितलं जातं. 

भावा... हे कोल्हापूर हाय... इथं असंच होतंय... एखाद्या शहराचं खास वैशिष्ट्य हे एखादेच असते. पण, कोल्हापूर मात्र जगात भारी हाय राव. इथली प्रत्येक गोष्ट वर्ल्ड फेमस आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांसारखा दूरदृष्टीचा राजा या कोल्हापुरला लाभला. हे इथल्या लोकांचं भाग्यच म्हणावं लागंल. कोल्हापुरी भाषा, कोल्हापुरी पायताण, इतकंच काय तर इथले खाद्यपदार्थही काही कमी नाहीत. 

जसे इंग्रजी भाषेत 

I would = I'd
I Will = I'll
तसेच कोल्हापूरी भाषेत 
गेलो होतो = गेलतो
आलो होतो = आलतो

smileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmiley

hotya:- कोल्हापुर शहरात शिकणाऱ्या पाल्याच्या पालकांसाठी महत्वाची सूचना!!!!
सर्व पालकांना विनंती आहे कि,
येत्या 14 तारखेला
1- उमा टॉकीज 
2-दसरा चौक 
3- c.b.s स्टँन्ड 
4-महाविर गार्डन 
5-शाहु नगर 
6-रंकाळा
7-खावु गल्ली 
एखादी चक्कर मारावी........
कदाचित तुम्हाला तुमच्या होणाऱ्या सुनेची,
किंवा होणाऱ्या जावायाची भेट होऊ शकते......! 
😂😂😂😂
धन्यवाद म्हणायची गरज नाही हे तर माझे कर्तव्य आहे।


smileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmiley

एखाद्या नवीन रस्त्याला कोणा नेत्याचे नाव देण्याऐवजी त्या रस्त्याच्या कंत्राटदाराचे नाव पत्ता आणि फोन नंबर दिला तर रस्ते आपोआप मजबूत आणि टिकाऊ होतील.
- अर्थातच एक कोल्हापूरकर


smileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmiley

पुणेकर : काय हो तुमच्या कोल्हापूर मध्ये
आमच्या पुण्यासारख्या सांस्कृतिक चळवळ
नाही दिसत..??
पक्या : तस्ल काय नाय आमच्याकड...
कारण भावा..
चळवळ करायला आमच्यातली
संस्कृती अजून संपली नाय..
पुणेकर : म्हणजे, मी नाही समजलो..?
पक्या : सक्काळ सक्काळी अजून बंब
पेट्त्यात...
दार इतभर असलं
तरी रांगोळ्या घालताेय....
पैस नसले
तरी दोस्तासाठी उसन घताे़य..
कोंच्या बी गल्लीतल कोण
बी आणि कवाबी मेलं
तरी न बोलावता जमताेय..
आणि कोल्हापूर
बघायला आलेल्या पावण्यान पत्ता
विचारला तर
''बस कि भावा गाडीवर..२ मिन्टात
पोहचवीतो..
रिक्षाला कशाला पैस घालताेय''
अस म्हणता..
ते बी पेट्रोल चा भाव
किती बी वाढला तरी...
तवा भावा...
ते चळवळीची वळवळ
कोल्हापूर मध्ये तर काय गरजेची नाय..
कारण आमची संस्कृतीच
अशी हाय...
आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे टेस्ट केलं
तरी वितळतं, वेस्ट केलं तरी वितळतं !!
म्हणुन आयुष्य टेस्ट करायला शीका वेस्ट तर
ते
तसंही होतच आहे....
शेवटी कोल्हापूरकर
तो कोल्हापूरकरच
आली लहर केला कहर तोच
खरा कोल्हापूरकर
जे आमच्या मनात असत तेच आमच्या ओठांवर
असच.
"म्हणुणच कोल्हापूरकरांचा नाद खुळा.....
MH - 09
जगात भारी.....!!


smileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmiley

"आधार कार्ड काढून मिळेल".
असा बोर्ड वाचून गण्या हापिसात शिरला..
"सायेब...आधार कार्ड काढून पायजेलाय."
"हं...बसा."
"चला की सायेब."
"आं........
कुटं चला ?"
नाल्यात पडलया आधार कारड..
काढून द्या की चला.

smileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmiley
कोल्हापूरच्या नावातच एक प्रकारचा रांगडेपणा
दडलेला आहे. त्यामुळे उगा कुचकुचत जेवणाऱ्यांनी
कोल्हापूरच्या वाटेलाच जाऊ नये. मुंबईच्या आणि
पुणेकरांच्या हिशेबी वृत्तीनुसार वाटीभर 'एक्स्ट्रा'
रस्सा आणि एक्स्ट्रा चटणीचा हिशेब येथे केला
जात नाही. 'अजून घे की रं मर्दा' म्हणत बादलीनंच
रस्सा वाढणारेदेखील आहेत या शहरात. त्यामुळे
कोल्हापुरात जायचं तर भरपूर खावं-प्यावं आणि
भरपूर फिरावं. भले आपण पैलवान नसू पण
पैलवानांच्या गावात गेल्यावर शहरी कोतेपणा
बाजूलाच ठेवावा. अर्थात त्याआधी आणखी एक
ध्यानात घ्यावं. महाराष्ट्रातच नाही तर देशभरात
उडपी हॉटेल अथवा अन्यांनी कोल्हापुरी जेवण
म्हणून मिरची पावडर आणि गरममसाला टाकून जे
काही लालभडक पदार्थ खायला लावले आहेत ते
म्हणजे कोल्हापुरी नाही. कोल्हापुरी म्हणजे
चमचमीत, पण उचकी लावणारं नाही. त्याची चव
न्यारीच.

मी कोल्हापुरकर...

smileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmiley

असे काही कोल्हापुरी शब्द आहेत की जे नादखुळा आहेत व जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला ऐकाला मिळणार नाहीत..

वरकी (बटर)
डबरा (खड्डा)
ईस्कुट (खेळ खंडोबा)
बाउ (मटन)
वज्ज (ओझे)
शिप्पारस (शहाणपणा)
गबस (गप्प बस)
लांबडं(साप)
कानुला (करंजी)
आदुगर (आधी)
अडगं (वेडा)
निवद (नैवेद्य)
गुळमाट (गोड)
हानबडीव (मार)
डकीवणे (चिकटवणे)
ढांपी (फांदी)
पारबती टाकी (पार्वती थिएटर)
शिस्तात (हळू)
गुळमाट (गोड)
कडकडन सुट (परत जा)
बारडी (बादली)
डांब (खांब)
गुडग्यात मेंदू (अर्धवट)
महादबा रोड (महाद्वार रोड)
अंडरखाली
रिक्स (रिस्क)
काय ताटाय लागलाईस (माज दाखवतोयस)
लज्गरी (लक्जरी बस)
टाम्याटु (टोमॅटो)
हारकलाईस काय (रोमांचित)
हरखून टुम्म (एकदम खुश)
टकुरर् (डोकं)
साळुता (झाडू)
बसल्या बैठकीला (लगेच)
वळका बघू...? (ओळखा पाहू)
डोस्क्यात काय येईना (आठवेना)
घुमीव (फिरव)
हान (मार)
रगात (रक्त)
गप गार (चिडी चुप)
ढोपर फोडिन (कोपर फोडीन)
लय राघु वानी बोलु नगस (मस्का मारू नको)
इरुन फिरुन गंगावेश (पुन्हा तिथेच)
डोस्क (डोकं)
बुंडुकल्या (छोट्या)
हेंगाड (वेडपट)
भस्का (भगदाड)
MH0⃣9⃣खटकयाव बोट जाग्यावर पलटी

smileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmileysmiley

Related image

Related image

Related image