Sat, Apr 20, 2019 09:59होमपेज › Kolhapur › कार्यकर्त्यांनी निष्ठा, चिकाटीने काम करावे : पालकमंत्री

कार्यकर्त्यांनी निष्ठा, चिकाटीने काम करावे : पालकमंत्री

Published On: May 28 2018 1:42AM | Last Updated: May 27 2018 10:04PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कार्यकर्त्यांनी निष्ठा, सेवावृत्ती आणि चिकाटीने काम केल्यास एक चांगला कार्यकर्ता निर्माण होऊ शकतो, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. बजरंग दलातर्फे आयोजित शौर्य प्रशिक्षण शिबिराच्या सांगता समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महेेंद्र वैद्य होते. राजाभाऊ चौधरी यांनी स्वागत केले. श्रीकांत पोतणीस यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कैलाश काइंगडे यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. सुधीर जोशी वंदुरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन अशोक रामचंदानी, संभाजी साळुंखे, रणजित आयरेकर, महेश कामत, रिंकू सोनार, सुधीर सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले होते.