Fri, Jul 19, 2019 17:42होमपेज › Kolhapur › चंदगड : लाच घेताना महिला पोलिस ताब्‍यात 

चंदगड : लाच घेताना महिला पोलिस ताब्‍यात 

Published On: Feb 14 2018 7:58PM | Last Updated: Feb 14 2018 7:58PMचंदगड : प्रतिनिधी 

चंदगड पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कॉन्स्टेबलला तीनशे रूपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने  रंगेहाथ पकडले. दीपाली दशरथ खडके असे लाच घेणाऱ्या कॉन्टेबलचे नाव आहे. ही कारवाई आज ५ वाजता करण्यात आली.

याबाबत दिपालीच्या विरोधात जंगमहट्टी येथील भोसले यांनी लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची खातरजमा करून लाचचलुचपत भिगाने सापळा लावून लाचेची रक्‍कम घेताना रंगेहाथ पकडले. दीपाली ही चंदगड पोलिस ठाण्यात पासपोर्ट व गोपनीय विभागात काम करत होती. २०१३ साली ती पोलिसात भरती झाली होती.