Sun, Apr 21, 2019 14:38होमपेज › Kolhapur › औषधाशिवाय आनंदी जीवन जगणे शक्य : डॉ. पाटील

औषधाशिवाय आनंदी जीवन जगणे शक्य : डॉ. पाटील

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 29 2018 12:36AMकोल्हापूर : प्रतिनिधी

आहार, विहार आणि व्यायाम या व्यक्‍तीच्या ऊर्जा आहेत. त्या ऊर्जांचे महत्त्व जाणले पाहिजे. त्याचे नियमित पालन करून जीवनात सकारात्मक बदल घडवून आणता येईल. आजार समजून घेऊन त्याच्याशी सामना केल्यास औषधाशिवायही आनंदी जीवन जगता येईल, असे मत लेसर हिमोथेरपीचे संस्थापक गोल्ड मेडिलिस्ट ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. शैलेंद्र पाटील यांनी व्यक्‍त केले. 
दैनिक ‘पुढारी’ आणि रूद्रा लेसर हिमोथेरपी क्‍लिनिक यांच्या संयुक्‍त विद्यमाने ‘अवघड आजार... सोपा उपचार’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. नवीन देवल क्‍लब येथे गुरुवारी व्याख्यान झाले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

दै. ‘पुढारी’चे विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार यांनी डॉ. पाटील यांचे रोप देऊन स्वागत केले. डॉ. पाटील म्हणाले, मधुमेह, रक्‍तदाब, हृदयविकार आदी कोणतेही आजार असोत, त्यात डॉक्टरांपेक्षा रुग्णांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. आजाराच्या मुळात जोवर जाणार नाही, तोवर त्यातून बाहेर पडणे अशक्य आहे. निरोगी आणि सुखी जीवनासाठी स्वत:ला शिस्त लावा. आहारावर नियंत्रण ठेवा. योग्य आहारासोबत नियमित व्यायाम करा. दररोज प्राणायम करा. शरीराला आहारातून ग्लुकोज, प्रोटिन्स मिळतात. त्यामुळे तुम्ही काय खाता यापेक्षा कसे खाता, हेही महत्त्वाचे आहे. औषध हे जेवण नाही, तर जेवनच हे तुमचे औषध बनले पाहिजे. शरीराला आवश्यक तेवढेच खा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

लेसर हिमोथेरपीविषयी डॉ. पाटील म्हणाले, लेसर हिमोथेरपी हा नैसर्गिक पद्धतीने निरोगी आयुष्य जगण्याचा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असा मार्ग आहे. लेसर किरणांनी रक्‍ताचे केले जाणारे शुद्धीकरण म्हणजेच लेसर हिमोथेरपी होय. लेसर ही एक ऊर्जा आहे. या उपकरणाने थेट रक्‍तातले दोष कमी करता येतात. सर्व आजारांवर हिमोथेरपीने उपचार करता येतात. एकाग्रता वाढविण्यासह फरफॉर्मन्स अधिक चांगला करण्यासाठी ही उपचार पद्धती फायदेशीर आहे. या उपचाराचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. कमीत कमी तीन ते सहा महिने उपचार घ्यावे लागतात. 
प्रश्‍नोत्तरप्रसंगी डॉ. पाटील यांनी उपस्थितांच्या विविध शंकांचे साध्या, सोप्या भाषेत निरसन केले.