Sun, Nov 18, 2018 05:59होमपेज › Kolhapur › कर्जमाफीच्या कामाला येणार गती

कर्जमाफीच्या कामाला येणार गती

Published On: Jan 16 2018 2:10AM | Last Updated: Jan 15 2018 10:30PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

गेले पंधरा दिवस संथ गतीने सुरू असलेले शेतकरी कर्जमाफीचे काम आता गतीने होण्याचे संकेत मिळत आहेत. जिल्ह्यातील 53 हजार 886 शेतकर्‍यांची यलो यादी तर 38 हजार 754 शेतकर्‍यांची  राज्य शासनाने जिल्हा बँकेकडे पाठवली आहे. या यादीची तपासणी कशी करावी, याबाबतचे प्रशिक्षण सोमवारी (दि.15) देण्यात आले. या प्रशिक्षणास 250 अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कर्जमाफीचे समन्वयक राजेंद्र महाजन या प्रशिक्षणास निरीक्षक म्हणून उपस्थित होते. जिल्हा परिषद सोसायटीत हे प्रशिक्षण घेण्यात आले.

राज्य शासनाने शेतकर्‍यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी जिल्ह्यातील 2 लाख 58 हजार शेतकर्‍यांनी ऑनलाईन अर्ज भरले असून, आतापर्यंत 90 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. यानंतर कर्जमाफीच्या यादीतील गोंधळानंतर एक यादी रद्द करण्यात आली. त्यानंतर आता नव्याने शासनाने 53 हजार 866 शेतकर्‍यांची यादी पाठवली आहे. तर 38 हजार 754 शेतकर्‍यांच्या यादीत अनेक त्रुटी असल्याने ही माहिती तपासण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. शासनाच्या सूचनांची माहिती देण्यासाठी सोमवारी अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. 

तांत्रिक तपासणी वेळेत करावी : काकडे
यलो लिस्टमधील दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. तर 38 हजार 754 शेतकर्‍यांची जी यादी तालुकास्तरीय तांत्रिक समितीकडे आली आहे त्याचेही कामकाज सुरू होणार आहे. या यादीत असणारी माहिती व प्रत्यक्षात कर्जदारांनी भरलेली माहिती पडताळून पाहण्यात येणार आहे. या याद्या तपासणीची जबाबदारी ज्या अधिकारी, कर्मचार्‍यांवर सोपवण्यात आले आहे त्यांनी आपापले काम वेळेत व अचूक पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी केले.