Mon, Apr 22, 2019 16:03होमपेज › Kolhapur › नगरसेवक आता तरी रस्त्यावर उतरणार का?

नगरसेवक आता तरी रस्त्यावर उतरणार का?

Published On: Apr 27 2018 12:44AM | Last Updated: Apr 27 2018 12:44AMकोल्हापूर :

तावडे हॉटेल परिसरातील जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक अग्रेसर राहिले होते. उच्च न्यायालयाने 22 फेब्रुवारीला संबंधित जागा महापालिका हद्दीत असल्याचे आदेश दिल्यावरही सत्ताधारी नगरसेवक कारवाईसाठी आक्रमक होते. महापालिकेतील विरोधी भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवकांनी मौन बाळगले होते.

अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका प्रशासनातील अधिकार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरू, असे म्हणणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक खरोखरच रस्त्यावर उतरणार का? तसेच कोल्हापूर शहराच्या विकासासाठी भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक प्रशासनाला सहकार्य करणार का? असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

Tags ; Kolhapur, Will, councilors, still, road