Sun, Sep 23, 2018 08:32



होमपेज › Kolhapur › '...तर मंत्रालयाबाहेर अंबाबाईचा गोंधळ घालू'

'...तर मंत्रालयाबाहेर अंबाबाईचा गोंधळ घालू'

Published On: Jan 10 2018 2:55PM | Last Updated: Jan 10 2018 3:58PM

बुकमार्क करा




कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्हापुरातील श्री करवीर निवासीनी अंबाबाई देवी मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबत पुजारी हटाव कृती समिती पुन्हा आक्रमक झाली आहे. येत्या 15 दिवसात पगारी पुजारी नेमण्यासह अन्य मागण्यांबाबत राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास मंत्रालयाच्या दारात आई अंबाबाईचा गोंधळ घालण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे. याबाबतचे निवेदन समितीने महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. 

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासंदर्बात गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरु झाले आहे. विठ्ठल रखुमाई मंदिर, पंढरपुर, साईबाबा देवस्थान शिर्डी, तुळजा भवानी मंदिर, तुळजापुर या मंदिरांप्रमाणे अंबाबाई मंदिरात देखील पगारी पुजारी नेमण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी 20 जुन 2017 रोजी सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. 

गेल्या सात महिन्यात कृती समितीने केलेल्या मागण्यांबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. सरकार अप्रत्यक्षपणे गैर कारभार करणाऱ्या पुजाऱ्यांना सहकार्य करत असल्याचे देखील या निवेदनात म्हटले आहे. राज्य सरकारने 15 दिवसात पुजारी हटाव, पगारी पुजारी नेमणे आणि अन्य मागण्या मान्य न केल्यास प्रथम पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या दारात आणि नंतर मुंबईत मंत्रालयाच्या दारात अंबाबाईचा गोंधळ घातला जाणार असल्याचे कृती समितीने म्हटले आहे. 

संबंधित बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
अंबाबाई मंदिर पगारी पुजारी नेमण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा
अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यास शासनाकडून चालढकल : आ. क्षीरसागर
अंबाबाई मंदिरातील पुजारी हटावसाठी आंदोलन’