Fri, Nov 16, 2018 02:29होमपेज › Kolhapur › पतीने जेवणात मीठ जास्त का विचारल्याने पत्नीची आत्महत्या

पतीने जेवणात मीठ जास्त का विचारल्याने पत्नीची आत्महत्या

Published On: Mar 06 2018 12:38AM | Last Updated: Mar 06 2018 12:31AMगडहिंग्लज : प्रतिनिधी

जेवणामध्ये मीठ जास्त का झाले आहे, अशी पतीने विचारणा केल्याने वैशाली संजय सावंत (वय 35, रा. माणिकबाग गडहिंग्लज, मूळगाव गंगाखेड, जि. परभणी) या विवाहितेने बेडरूममधील पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.  

सावंत हे शिवराज महाविद्यालयाकडे प्राध्यापक म्हणून काम करतात. वैशाली याही उच्च शिक्षित होत्या. जेवणामध्ये मीठ जास्त का झाले, अशी विचारणा पती संजय यांनी करताच वैशाली या रागावून बेडरूममध्ये गेल्या. नेहमीप्रमाणे पत्नी रागावून गेली असेल, असा विचार करून संजय यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, वैशाली यांनी पंख्याला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. सावंत यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी आरडाओरडा केला. गडहिंग्लज पोलिसांत आत्महत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.