Sat, Jun 24, 2017 10:44
25°C
  Breaking News  

होमपेज › Kolhapur › पत्नीदेखत पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

पत्नीसमाोरच पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By | Publish Date: Jun 21 2017 3:42PM

कोल्हापूर : प्रतिनिधी

पत्नीसोबत झालेल्या किरकोळ वादातून पतीने पाण्याच्या टाकीवरुन उडी घेवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कोल्हापूर शहरातील शेंडापार्क येथे घडली. या घटनेत पती संतोष बापू गायकवाड (वय 38,रा.राजेंद्रनगर) हा गंभीर स्वरुपात जखमी झाला असून उपचारार्थ त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

विस्तारीत घटना अशी, जखमी संतोष हा गंवडी कारागीर असून तो पत्नीसोबत राजेंद्रनगर परिसरात राहतो. पत्नीसोबत झालेल्या किरकोळ वादातून संतोष रागाने घराबाहेर पडला व शेंडापार्क येथील पाण्याच्या टाकीजवळच्या कठड्यावर जावून झोपला. थोड्या वेळाने पत्नी त्याला बोलवायला आली. मनातून राग न गेलेला संतोष तिला पुन्हा शिवीगाळ करु लागला.  

रागाच्या भरात संतोष ३० फुट उंच असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चढला. पत्नी त्याला खाली उतरण्याची विनंती करत होती मात्र याची पर्वा न करता त्याने टाकीवरुन खाली उडी मारली. या घटनेत दगडावर आपटल्याने त्याच्या मणक्यासहीत पायाला गंभीर ईजा झाली.  घटनेनंतर नागरीकांनी त्याला सीपीआरमध्ये दाखल केले.

संतोषची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले असून या घटनेची नोंद राजारामपुरी  पालिस ठण्यात नोंद झाली आहे.