Wed, Sep 19, 2018 22:32होमपेज › Kolhapur › जयंती नालाप्रश्‍नी कारवाई का करू नये?    

जयंती नालाप्रश्‍नी कारवाई का करू नये?    

Published On: Jun 07 2018 2:05AM | Last Updated: Jun 07 2018 1:32AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जयंती नाल्यातील पाणी थेट पंचगंगेत मिसळत असल्याने आपल्या कायदेशीर कारवाई का करू नये, अशी विचारणा प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला केली आहे. याबाबत बुधवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसांत याबाबत खुलासा करावा अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.जयंती नाल्याचे पाणी कोणत्याही प्रक्रियेविना पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे मंगळवारी (दि.6) प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर अधिकार्‍यांनी पंचनामा केला. यावेळी जयंती नाला परिसरातील महापालिकेचे पंपिंग स्टेशन बंद असल्याचे आढळून आले.

याठिकाणी डीजी सेटही जोडण्यात आलेला नाही.निर्जंतूक प्रक्रिया बंद होती.नाल्याच्या दोन्ही बाजूला कचर्‍याचे ढिग होते. पाण्यातून घनकचरा वाहत पुढे नदीत जात होता. मैलामिश्रित पाणी थेट नदीत मिसळले जात होते. अशीच स्थिती दुधाळी नाल्याबाबतही आढळून आले.याबाबत प्रादेशिक अधिकारी नागेश लोहळकर यांनी महापालिकेला कारणे दाखवा नोटीस आज बजावली. आजपासून सात दिवसांत याबाबतचा खुलासा मागवला आहे. हा खुलासा आल्यानंतर त्याबाबत पुढीलनिर्णय घेतला जाणार आहे.