Sun, Jul 21, 2019 01:29होमपेज › Kolhapur › जोतिबा भक्तांच्या मदतीला धावला केदार!

जोतिबा भक्तांच्या मदतीला धावला केदार!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : एकनाथ नाईक 

भक्तांच्या सेवेत गेली चार दिवस कोल्हापूरच्या जीवन मुक्ती सेवा संस्थेचे (व्हाईट आर्मी) जवान होते.शनिवारी दुपारी अचानक मधमाशांनी चव्हाण तळ्यालगत थांबलेल्या भक्तांवर हल्ला केला.यामध्ये अनेक भक्तांचा चावा माशांनी घेतल्याने अनेकांची प्रकृती बिघडली.या भक्तांच्या मदतीला व्हाईट आर्मीचा जवान केदार गुरव (दोनवडे) धावून आल्याने अनर्थ टळला.

अलोट गर्दी व मोठ्या भक्तिमय वातावरणात दख्खनचा राजा जोतिबाची यात्रा शनिवारी झाली.जगभरातून भक्तांनी यात्रेला हजेरी लावली होती.गेली 13 वर्षे व्हाईट आर्मीचे जवान भक्तांना आरोग्य, दर्शन रांगा,पार्किंग,पाणी, जेवण यासह विविध प्रकारच्या मदतीसाठी विनामोबदला सेवेत सहभागी झालेले असतात. जोतिबा यात्रेत 150 हून अधिक पुरूष व महिला जवान सेवेत होत्या.यामध्ये जीवनमुक्ती संस्थेने भक्ताना वैद्यकीय, रेस्न्यु टिम, आपत्तीकालीन कक्ष, हार्ट बिग्रेड, विश्रांती गृह, शोधमोहीम आदी विविध प्रकारच्या सेवा भक्तांना दिल्या.जोतिबा डोंगर येथील चव्हाण तळ्यावर जवान केदार गुरव भक्तांच्या सेवेत होते.तळ्यावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून लक्ष ठेवून होते.शेजारीच एका डेरेदार झाडांच्या खाली भक्त चुलीवर जेवण तयार करीत होते.त्याच झाडावर मधमाशांचे पोळे होते.धुरामुळे मधमाशा उठल्या आणि भक्तांवर हल्ला  केला. हा प्रकार केदारच्या लक्षात येताच त्याने धाव घेतली.मधमाशांच्या चाव्यामुळे भक्त धावत होते.पळू नका काय होत नाही असे केदार सांगत होता. आपले लाईफ जॉकेट काढून मधमाशांच्या हल्ल्यात सापडलेल्या भक्तांना जवळच असलेल्या रूग्णवाहिकेत आणत होता.यामध्ये हल्ल्यात तानाजी कुंभार, बाळासो कुंभार, विलास कुंभार, रामचंद्र कुंभार, चंद्रकांत कुंभार अशा अनेक भक्तांवर मधमाशांनी हल्ला केला.या सर्वांना घेऊन तो रूग्णवाहिकेतून उपचारासाठी सीपीआरमध्ये घेऊन आला. 

भाविकांना मदतीचा हात देणार्‍या केदारला देखील मधमाशांनी सोडले नाही.त्याच्या चेहर्‍यावर हातावर आणि पायावर चावा घेतला आहे.त्यामुळे त्याचा चेहरा आणि अंग सुजले आहे.विनामोबदला भक्तांना सेवा देणार्‍या व्हाईट आर्मिच्या जवानांचे भक्तांनी कौतुक केले. जखमी असतानाही केदारने यात्रेतील भक्तांना अखंड सेवा दिला.

 

Tags : kolhapur Jyotiba devotees, White Army jawan 


  •