Fri, Apr 26, 2019 15:21होमपेज › Kolhapur › सप्टेंबर आला... ऊस उत्पादकांच्या उर्वरित २०० रु.चे  काय?

सप्टेंबर आला... ऊस उत्पादकांच्या उर्वरित २०० रु.चे  काय?

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 23 2018 12:06AMकुडित्रे : प्रतिनिधी 

सहकारी साखर कारखान्यांनाही 30 सप्टेंबरपूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यावी लागणार आहे. त्यापूर्वी कारखान्यांना आपले हिशेब पूर्ण करावे लागणार आहेत. म्हणजे 2017 - 2018 चा ऊस दर ठरवावा लागणार आहे. कारखान्यांनी एफ.आर.पी. दिली,पण आश्‍वासित एफ.आर.पी. अधिक 200 या सूत्रानुसार उर्वरित रक्‍कम गौरी-गणपती सणापूर्वी देऊन अतिवृष्टीने खचलेल्या ऊस उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

एफ.आर.पी. अधिक 100 रुपये ताबडतोब या सूत्रानुसार सर्वच कारखान्यांनी हंगामाच्या सुरवातीची ( साधारणत: 15 डिसेंबरपर्यंत) उचल दिली. तिथून पुढची बिले प्रथम 2500 रुपयांप्रमाणे व पुढे फरक काढून एफ.आर.पी. बिले नुसार दिली. पण अजून अनेक कारखान्यांनी एफ.आर.पी. नंतरच्या प्रतिटन 100 रुपयांच्या बिलांच व त्यापुढील प्रति टन 100 रुपयांचे नावही काढलेले नाही. ऊस उत्पादक या आश्‍वासित प्रतिटन 200 रुपयांच्या पतिक्षेत आहेत.

अतिवृष्टीचा प्रचंड फटका!

पंचगंगा , भोगावतीसह इतर नद्या , ओढे - नाल्यांना आलेल्या पुरामुळे सुमारे 25 हजार हेक्टर्स क्षेत्र धोक्यात आहे. गेले दोन महिने संततधार पावसामुळे सर्वच ऊस क्षेत्राला फटका बसला आहे. तांबेरा, मावा, हुमणी या रोगांमुळे , गारठा, धुके, सततचा पाऊस यामुळे संपूर्ण गगनबावडा, करवीर व पन्हाळ्याचा पाश्‍चिम भागातील उसाची 60 ते 70 टक्क्यांपर्यंत हानी झाली आहे. जिल्हयात यंदा 1 लाख 42 हजार 336 हेक्टर उसाचे तर 1 लाख 10 हजार हेक्टर्स भाताचे क्षेत्र आहे. उसाचे 9 हजार 171 हेक्टर्स आडसाल, 35 हजार 855 हेक्टर्स पूर्व हंगामी उसाच्या लागणीचे क्षेत्र आहे.पैकी 25 हजार हेक्टर्स क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. जिल्हयात 671, 86032, व 92005 या जातीची लागवड आहे. यापैकी 92005 या जातीची लागवड करणारे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. 

...काय ठरले होते?

हंगामाच्या सुरुवातीला  एफ.आर.पी. अधिक 100 रुपये ताबडतोब व 100 रुपये दोन महिन्यानंतर या ‘स्वयंघोषित’ दरावर पालक मंत्र्यांच्या साक्षीने फॉर्म्यूल्यावर आले. पुढे काही कारखान्यांनी तीन हजारांच्या वर उचल दिली. पण गट्टी करून एफ.आर.पी. ला ठेंगा दाखवत प्रतिटन 2500 रुपयांनी उचल देण्याचा सामूहिक निर्णय घेतला. पण, काही कारखान्यांनी ती बिलेही थकवली आहेत.  कारखान्यांनी आश्‍वासनाप्रमाणे अधिक 200 च्या दराची पूर्तता करण्याची मागणी होत आहे.