Thu, Mar 21, 2019 15:26होमपेज › Kolhapur › ...तरीही सरकार गप्प का? : संभाजी ब्रिगेड

...तरीही सरकार गप्प का? : संभाजी ब्रिगेड

Published On: Jan 04 2018 1:20AM | Last Updated: Jan 04 2018 8:46AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव प्रकरणामुळे राज्यभर गेल्या आठवड्यापासून दंगलसदृश परिस्थती निर्माण होऊनही सरकार गप्प का, असा सवाल संभाजी ब्रिगेडच्या कोल्हापूर जिल्हा शाखेने पत्रकाद्वारे केला आहे. कोल्हापूरची परिस्थिती चिघळेपर्यंत सरकारने कोणतीच हालचाल केली नाही. यामुळे या परिस्थितीस सर्वस्वी सरकार कारणीभूत आहे. डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखविणारे महाराष्ट्राला दंगल इंडिया करत आहेत, फडणवीसांचे हेच का अच्छे दिन? प्रशासनाने शांतता पसरविण्यासाठी प्रयत्न करावेत. कोल्हापुरात शांतता व सलोखा निर्माण करावा आणि दोन्ही समाजांतील तरुणांनी संधीसाधू नेत्यांपासून सावध राहावे.

तरुणांच्या हातात दगड देऊन तो दुसर्‍याला मारायला शिकविणारे भिडे व एकबोटे यांच्यासारखे खरे चेहरे समाजासमोर आले आहेत. असे असताना पुरोगामी कोल्हापूरात घडलेला प्रकार चुकीचा असल्याचे पत्रकात म्हटले आहे. पत्रकावर जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील, अभिजित भोसले, धीरज चौगले, निहाल खान, सुमंत पाटील, पृथ्वीराज पाटील, विनायक पाटील, शरद पाटील, अरुणा ताशिलदार, अनुजा भोसले यांची नावे आहेत.