Sat, Apr 20, 2019 10:29होमपेज › Kolhapur › ‘आयर्न मॅन्स’चे जल्लोषी स्वागत

‘आयर्न मॅन्स’चे जल्लोषी स्वागत

Published On: Jul 11 2018 1:36AM | Last Updated: Jul 10 2018 11:15PMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

बर्फाने व्यापलेला प्रदेश, रक्‍त गोठविणारा गारठा अशा प्रतिकूल वातावरणात सायकलिंग-स्विमिंग आणि रनिंग अशी जागतिक स्पर्धा यशस्वीरीत्या फत्ते करून ‘वर्ल्ड आयर्न मॅन’चा किताब पटकाविणार्‍या कोल्हापूरच्या मावळ्यांचे मंगळवारी कोल्हापुरात आगमन झाले. त्यांचे जंगी स्वागत कोल्हापूरकरांनी केले. कोल्हापुरात येताच सर्व खेळाडूंनी रणरागिणी ताराराणी यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. युरोपातील ऑस्ट्रिया येथे झालेल्या या स्पर्धेचे खडतर अंतर निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण करत कोल्हापूरच्या मावळ्यांनी  देशाचा तिरंगा अभिमानाने फडकविला. 4 कि.मी. जलतरण, 180 कि.मी. सायकलिंग आणि 42 कि.मी. धावणे अशी कस लावणारी ही स्पर्धा होती. 

कोल्हापूर स्पोर्टस् क्‍लबच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचा कसून सराव करणार्‍या उदय पाटील, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. संदेश बागडी, आशिष तंबाके, डॉ. विजय कुलकर्णी, रौनक पाटील, आदित्य शिंदे,  स्वप्निल माने, विनोद चंदवाणी, महेश मेठे, विशाल कोथळे, चेतन चव्हाण, सत्यवान नणावरे व बलराज पाटील यांनी या स्पर्धेत भरघोस यश मिळविले. ‘आयर्न किडस्’ मध्ये वरद पाटील व नीरव चंदवाणी यांनी बाजी मारली. टीम कोल्हापूरला ‘आयर्न मॅन’ वैभव बेळगावकर आणि आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील जलतरण तलावाचे प्रशिक्षक नीळकंठ आखाडे, अश्‍विन भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. कोल्हापुरी फेटा बांधून सर्वांचा सन्मान करण्यात आला. 

या सर्व मावळ्यांचे स्वागत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जयेश कदम, उत्तम फराकटे, नगरसेवक संजय मोहिते, रत्नेश शिरोळकर, अमर धामणे, शाम कागले, एस.आर. पाटील, केएमएचे अध्यक्ष डॉ. जाधव, डॉ. संंजय यादव, डॉ. उदय मुधाळे,  रजनीकांत पाटील, राम बेळगावकर, विकास रेडेकर, एन. एस. भोसले, शाम कोरगावकर, मिलिंद कुलकर्णी, विजय यवलुजे आदींनी केले. यावेळी क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.