Wed, Feb 20, 2019 03:06होमपेज › Kolhapur › शस्त्रास्त्रप्रकरणी टोळीस अटक

शस्त्रास्त्रप्रकरणी टोळीस अटक

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 1:23AM

बुकमार्क करा
उजळाईवाडी : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर  कोंडुसकर पेट्रोल पंपाजवळ जिल्ह्यात जमावबंदी आदेश असताना शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी (एम एच 04-बी. डब्ल्यू 2542) या क्‍वॉलिस गाडीसह नऊ जणांच्या टोळीला अटक केली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

प्रफुल्‍ल चोखोबा कांबळे (वय 19, रा, माद्याळ, ता. कागल), सोनल चोखोबा कांबळे (24, रा. माद्याळ), प्रकाश सुभाष गावडे (24, येमटी, ता. गडहिंग्लज), निवृत्ती मारुती घाडगे  (37, रा. आंबरोळी, ता. चंदगड), हणमंत सोमा कांबळे (24, रा. कानूर, ता. चंदगड), सौरभ अशोक भोसले (21, बेळगाव), सुनील शिवाजी सुतार (27, रा. धामणे, ता. गडहिंग्लज), अमोल अर्जुन कांबळे (रा.कानूर
खुर्द, ता. चंदगड) यांना अटक केली आहे.

त्यांच्याकडे दोन तलवारी, एक कट्यार, स्टीलचा रॉड अशी हत्यारे सापडली आहेत. दरम्यान, ही टोळी गोकुळ शिरगाव परिसरात कोणत्या चोरीच्या, की खंडणीच्या उद्देशाने आली आहेत याचा पोलिस तपास घेत असून गोकुळ शिरगाव परिसरातीलएका व्यक्‍तीकडे एक कागल परिसरातील महाराजांचे वसुलीसाठी ही टोळी आली असल्याचे सूत्राकडून समजते.
पुढील तपास स.पो.नि. युवराज खाडे करीत असून या संदर्भात पोलिस कॉन्स्टेबल विशाल बाळकृष्ण खराडे यांनी फिर्याद दिली आहे.