Sun, Mar 24, 2019 08:18होमपेज › Kolhapur › ‘व्हर्टिकल अ‍ॅडव्हेंचर’ला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र बनवू : पाटील

‘व्हर्टिकल अ‍ॅडव्हेंचर’ला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र बनवू : पाटील

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 05 2018 12:26AMबोरपाडळे : वार्ताहर

पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार्‍या मसाई पठाराच्या पायथ्याशी सुरू असलेल्या व्हर्टिकल अ‍ॅडव्हेंचर पार्कला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पश्‍चिमेकडील महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या टेबललँड असलेल्या मसाई पठराच्या पायथ्याशी जिऊर ग्रामपंचायत, वन विभाग आणि  संयुक्त वन व्यवस्थापन समिती जिऊरमार्फत साकारत असलेल्या व्हर्टिकल अ‍ॅडव्हेंचर पार्क कामाच्या पाहणीवेळी ते बोलत होते.

ना. पाटील म्हणाले, जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी अशा प्रकारचे   विविध प्रकल्प उभारून शेती, औद्योगिक याबरोबरच पर्यटनातून रोजगार निर्मितीसाठी सरकार प्रयत्न करेल. पार्कच्या कामामध्ये कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत. तसेच प्रकल्पासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. या प्रकल्पामुळे स्थानिक लोकांना रोजगार निर्मितीबरोबरच रानमेव्याला बाजारपेठ मिळणार असून, पर्यटकांना वनपर्यटनाच आस्वाद घेता येणार आहे. यातून लोप पावत चाललेली पारंपरिक साहसी खेळांची परंपरा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

यावेळी उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ला,  प्रांताधिकारी अजय पवार, तहसीलदार रामचंद्र चोबे,  पृथ्वीराज सरनोबत, प्रकल्पाचे प्रमुख विनोद कांबोज, सरपंच प्रियांका महाडिक, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष धोंडिराम पाटील आदीसह वन व्यवस्थापन समिती  सदस्य  उपस्थित होते.