Mon, Apr 22, 2019 05:45होमपेज › Kolhapur › निम्म्या शहरातील पाणीपुरवठा आज बंद

निम्म्या शहरातील पाणीपुरवठा आज बंद

Published On: May 21 2018 1:05AM | Last Updated: May 21 2018 12:56AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापुरात सोमवारी निम्म्याहून अधिक शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ‘ए’, ‘बी’ व ‘ई’ वॉर्डासह त्यास संलग्‍नित उपनगरे, ग्रामीण भागाचा त्यात समावेश आहे. वीज वितरण कंपनीकडून पुईखडी येथील सबस्टेशनच्या मेंटनन्ससाठी विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार असल्याने कणेरकरनगर, चंबुखडी पाण्याची टाकी येथील 1100 मि. मी. व्यासाच्या मुख्य वितरण नलिकेवरील गळती काढण्याचे काम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तसेच मंगळवारीही अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेने पत्रकाद्वारे कळविले आहे.

पाणीपुरवठा न होणार्‍या भागांची नावे - ‘ए’, ‘बी’ वॉर्ड - संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड परिसर, कणेरकरनगर, निचितेनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, जीवबा नाना परिसर, आपटेनगर-रिंगरोड, महाराष्ट्र नगर, सुर्वेनगर, बापूरामनगर, साळोखेनगर, तपोवन, देवकर पाणंद, नाळे कॉलनी, संभाजीनगर व परिसर, विजयनगर, शहाजी वसाहत, श्री कृष्ण कॉलनी परिसर, रायगड कॉलनी, जरगनगर, एल. आय. सी. कॉलनी, आर. के. नगर, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रेसकोर्स नाका, हॉकी स्टेडियम परिसर, आयसोलेशन परिसर, नेहरू नगर, सुभाषनगर, शेंडापार्क परिसर, राजेंद्रनगर.‘ई’ वॉर्ड - न्यू शाहूपुरी, स्टेशन रोड, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, कावळा नाका परिसर, सदर बाजार, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, लोणार वसाहत, मार्केट यार्ड, शिवाजी उद्यमनगर, राजारामपुरी, टाकाळा खाण, माळी कॉलनी, राजारामपुरी एक्स्टेंक्शन परिसर, दौलतनगर, प्रतिभानगर, पांजरपोळ, शास्त्रीनगर, जवाहरनगर, सम्राटनगर, स्वातंत्र्यसैनिक वसाहत परिसर. महापालिकेच्या वतीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सहा टँकर उपलब्ध करण्यात आले असून, मागणीनुसार पुरवठा करणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.