Fri, Mar 22, 2019 06:16
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › वडगावचा कॉन्स्टेबल लाचप्रकरणी निलंबित

वडगावचा कॉन्स्टेबल लाचप्रकरणी निलंबित

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 2:35AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ अटक केलेल्या पेठवडगाव पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल दत्तात्रय श्रीपती चव्हाण (वय 40, रा. पेठवडगाव, ता. हातकणंगले) यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी ही कारवाई केली. खातेनिहाय चौकशीचेही आदेश दिले आहेत.

अदखलपात्र गुन्ह्यात प्रतिबंध कारवाईवेळी जामीन होण्यासाठी मदत करण्याकामी 500 रुपयांची लाच स्वीकारताना  कॉन्स्टेबल चव्हाण यांना बुधवारी रात्री उशिरा लाचलुचपत प्रतिबंध पथकाने रंगेहाथ पकडले होते. पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले व पथकाने ही कारवाई केली होती. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली होती. ‘लाचलुचपत’चा कारवाईचा अहवाल उपलब्ध होताच पोलिस अधीक्षक मोहिते यांनी सकाळी चव्हाण याला सेवेतून निलंबित केले.