Fri, Jul 19, 2019 05:15होमपेज › Kolhapur › जोतिबा यात्रेत ‘आवाजा’वर कंट्रोल

जोतिबा यात्रेत ‘आवाजा’वर कंट्रोल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


जोतिबा : वार्ताहर

ओ मावशी.. या हिकडं.. जरा वाईच थंडगार लस्सी घ्या.. अशा आवाजाने अवघा जोतिबा डोंगर दुमदुमून निघायचा, तो यावर्षी जिल्हा प्रशासनाच्या ध्वनिप्रदूषणाबाबतीतील कडक नियमांमुळे आणि कारवाईने नुकत्याच झालेल्या जोतिबा यात्रेत हा आवाज जोतिबाच्या बाजारपेठांमध्ये दुमदुमलाच नाही. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी जोतिबावरील यात्रा काळातील ध्वनिप्रदूषणावर आळा घालण्याच्या सूचना पोलिस विभागाला देण्यात आल्या होत्या. 

जोतिबा डोंगरची चैत्र यात्रा म्हटलं की, प्रामुख्याने कानावर शब्द पडतात ते लस्सी विक्रेत्यांच्या जाहिरातीचे शब्द. काही दुकानदार सकाळी 6 वाजल्यापासून लस्सीची ओ मावशी.. या हिकडं.. जरा वाईच थंडगार लस्सी घ्या.. अशी  जाहिरात स्पीकरवर मोठमोठ्याने लावत असतात. तसेच कॅसेट आणि सी.डी. विक्रेत्यांच्या जोतिबाच्या रीमिक्स आणि हिंदी गीतांच्या चालीवरील गाण्यांचा आवाज संपूर्ण बाजारपेठेत दणाणून निघायचा. जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त जोतिबा डोंगराच्या गल्ली बोळात लस्सीची आणि कॅसेटची दुकानं लागलेली असतात. यात्रा काळात यामुळे ध्वनिप्रदूषण होत असल्यामुळे ज्या सूचना यात्रा काळात भाविकांना जिल्हा प्रशासन ज्या सूचना स्पीकरवरून देत असते, त्या सूचना या गोंधळात भाविकांपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. 

यंदा झालेल्या यात्रेत पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या सूचनेनुसार पोलिस विभागाने ध्वनिप्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी लस्सी विक्रेते आणि कॅसेट विक्रेत्यांवर आवाजाच्या बाबतीत निर्बंध घालून स्पीकर जवळपास बंदच ठेवले होते. यामुळे यात्रा काळात जोतिबा डोंगरावरील संपूर्ण बाजारपेठेत पूर्णपणे शुकशुकाट होता. जोतिबा डोंगरावरील बाजारपेठ परिसरामध्ये सततच्या होणार्‍या या ध्वनिप्रदूषणामुळे बाजारपेठ परिसरातील बर्‍याच नागरिकांना रक्तदाबाचा विकार उद्भवलेला आहे. तसेच यामुळे वृद्ध नागरिकांना याचा जास्तच त्रास होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीसुद्धा येत आहेत. जिल्हा प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन अशा विक्रेत्यांना आवाजावर मर्यादा ठेवण्याबाबत सूचना देणे गरजेचे आहे.

Tags : kolhapur, Jotiba Yatra


  •