होमपेज › Kolhapur › एशियन गेम्ससाठी वीरधवल खाडेची निवड

एशियन गेम्ससाठी वीरधवल खाडेची निवड

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 1:17AMकोल्हापूर : प्रतिनिधी

गोल्डनबॉय वीरधवल खाडे यांची जाकार्ता (इंडोनेशिया) येथे ऑगस्ट महिन्यामध्ये होणार्‍या एशियन गेम्स्साठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. एशियन गेम्सअंतर्गत होणार्‍या जलतरण स्पर्धेमध्ये वीरधवल हा 50 व 100 मीटर फ्रीस्टाईड आणि 50 मीटर बटरफ्लाय तिन्ही प्रकारतून उतरणार आहे. जागतिक पातळीवरील एशियन गेम्समध्ये वीरधवल हा तब्बल 4 वर्षांच्या विश्रांतीनंतर सहभागी होत आहे.

दरम्यान, एशियन गेम्स्साठी स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने बेंगळूर येथे दोन आठवड्यांपूर्वी भारतीय जलतरण संघ निवड  चाचणीचे आयोजन केले होते. या चाचणीत वीरधवलने 50 व 100 मीटर फ्रीस्टाईल आणि 50 मीटर बटरफ्लाय या प्रकारांमधील आंतर पात्रता वेळेत पूर्ण केले. या कामगिरीची दखल घेऊन त्याची स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडियाने भारतीय जलतरण संघात निवड केली. वीरधवल हा सध्या प्रसिद्ध प्रशिक्षक निहार आमिन यांच्या मार्गदर्शनाखाली बेंगळूमधील द्रवीड पदुकोन जलतरण तलावावर सराव करत आहे.