Mon, May 20, 2019 08:56होमपेज › Kolhapur › उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ सचिवपदी विलास पाटील

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ सचिवपदी विलास पाटील

Published On: Jul 14 2018 12:21AM | Last Updated: Jul 14 2018 12:21AMमुंबई : प्रतिनिधी

भारतीय प्रशासन सेवेतील सहा वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास बी. पाटील यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर एस. के. दिवसे यांची वखार महामंडळात बदली करण्यात आली आहे.

केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य शासनाच्या सेवेत परतलेल्या बी. बी. मल्लिक यांची अप्पर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी संशोधन परिषद या पदावर कार्यरत असणारे आर. एस. जगताप यांची भंडारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. 

तर सौरभ विजय यांची यापूर्वीच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिव पदावर, कुणाल खेमनार यांची चंद्रपूर जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.