Tue, Mar 26, 2019 12:01होमपेज › Kolhapur › कॉलेजीयन्समध्ये प्रेमाचा उत्सव

कॉलेजीयन्समध्ये प्रेमाचा उत्सव

Published On: Feb 09 2018 2:18AM | Last Updated: Feb 08 2018 11:43PMकोल्हापूर : प्रतिनिधी

प्रेमाच्या शब्दरूपी भावना, प्रेमाची बांधिलकी व्यक्त करण्यासाठी तरुणाई आता सज्ज झाली आहे. शहरातील महाविद्यालयांचे कट्टे, बगिचे, कॉफी हाऊसेस, मॉलमध्ये सर्वत्र गुलाबी वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावरून व्हॅलेंटाईनच्या संदेशाची देवाणघेवाण सुरू असून याद्वारे आपल्या प्रियजनांपर्यंत भावना व्यक्त करण्याचा व्हॅलेंटाईन वीकला सर्वत्र गुरुवारी (दि. 8)उत्साहात प्रारंभ झाला. तसेच व्हॅलेंटाईन अ‍ॅप्स तयार करण्यात आली असून व्हॅलेंटाईन वीकअखेर ही अ‍ॅप्स कार्यरत असणार आहेत. यानिमित्त कॉलेजीन्समध्ये प्रेमाचा उत्सवच भरला आहे. काही ठिकाणी व्हॅलेंटाईन पार्टी, गेट टूगेदर असे कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय व्हॅलेंटाईन निमित्त खास केक आणि चॉकलेट्सही बाजारात उपलब्ध आहेत. काही चॉकलेट कंपन्यांनी हृदयाच्या आकाराचे चॉकलेट तयार केले असून याला कॉलेजीयन्स प्रेमवीरांची पसंती मिळते आहे. 

अर्थात, व्हॅलेंटाईन डे केवळ तरुण-तरुणींमध्ये साजरा केला जातो असे नाही, तर आई वडील, बहीण, भाऊ, मित्रमैत्रिणींतील प्रेम यादिवशी व्यक्त करता येते. मात्र, काही वर्षांपासून केवळ तरुणाईच्या वलयातच व्हॅलेंंटाईनला गुरफटून ठेवले आहे. त्यामुळे तरुणाईला भुरळ घालण्यासाठी बाजारपेठा अनेक वस्तूंनी बहरल्या आहेत. प्रेम व्यक्त करताना गुलाबाचा अधिक वापर होतो. टेडी बेअर, फोटो फ्रेम, ग्रिटिंग, कॉफी मग, व्हॅलेंटाईन स्टिकर्स, एकमेकांच्या नावाचे ब्रेसलेट आदी विविध भेटवस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. तसेच म्युझिकल कपल टेडी, टेडी विथ मॅसेज बॉटल, कुशन्स विलमॅच, किचन टेडी विथ हार्ट, लव मेसेज फोटो फ्रेम, मेसेज बॉक्स, म्युझिकल ग्रिटिंग, हँगिंग हार्ट, याशिवाय लव डायरीज, 50 आणि 100 लव मॅसेज बॉक्स, लव मॅझिक कार्ड, कपल शोपीस अशा असंख्य वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. 

गुलाबाचं फुल प्रेम व्यक्त करण्याचे उत्तम साधन मानले जाते. व्हॅटेलाईन वीकची सुरवात ‘ रोझ डे ’ होते. या दिवशी तरूण तरूणी आवडत्या व्यक्तिला गुलाबाचे फुल देवून आपले प्रेम व्यक्त करतात. या प्रेमाच्या महिन्यात गुलाबांना जगभरातून विशेष मागणी असते. शहरात शिंगोशी मार्केट, जोतिबा रोड, न्यू शाहुपूरी, राजारामपुरी येथील फुलांचे मार्केट विविध रंगाच्या गुलाबांनी सजले आहेत. गिफ्ट आर्टिकल्सची अनेक दूकाने विविध गिफ्टस्ने तरूणाईला आकर्षित करत आहेत.