Sun, Mar 24, 2019 23:52
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › नागरी सत्काराची जय्यत तयारी 

नागरी सत्काराची जय्यत तयारी 

Published On: Jul 11 2018 1:36AM | Last Updated: Jul 11 2018 12:26AMकोल्हापूर : प्रतिनिधी

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. योगेश जाधव यांची निवड झाल्याबद्दल दि. 14 जुलै रोजी करण्यात येणार्‍या  नागरी सत्कार करण्यासाठीची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.शहरातील विविध तालीम संस्था व मंडळांच्या वतीने शिवाजी मंदिर शिवाजी पेठ येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर सौ. शोभा बोंद्रे होत्या. 

डॉ. योगेश जाधव नागरी सत्कार समितीच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृह येथे शनिवारी (दि. 14)सिक्‍कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याबाबत शहरातील तालीम संस्था व मंडळांची बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले,  भविष्यात कोल्हापूरच्या विकासाला डॉ. योगेश जाधव यांच्यामुळे गती मिळणार आहे. शासनाने हे पद देऊन त्यांचा केलेला सन्मान हा कोल्हापूरचा सन्मान आहे. 

नाथागोळे तालीम मंडळाचे अध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले, हा कोल्हापूरच्या सुपूत्राचा सन्मान आहे.  तो तितक्याच दिमाखदार रीतीने साजरा होण्याची गरज आहे. जाधव परिवाराचे  व कोल्हापूरचे तीन पिढ्यांचे अतूट नाते आहे. अजूनही शहराचे अनेक प्रलंबित प्रश्‍न आहेत. ते सोडवण्यासाठी डॉ. योगेश जाधव यांची पूर्ण साथ मिळणार आहे. विक्रम जरग यांनी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. योगेश जाधव यांची केलेली निवड हा कोल्हापूरचा सन्मान आहे, असे सांगितले.

कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्‍न सुटण्यास आता कोणताचा अडथळा नाही, असे सांगितले. डॉ. योगेश जाधव यांच्या निवडीमुळे कोल्हापूरच्या  विकासकामांना दिशा मिळणार आहे, असे मठ तालीम मंडळाचे अध्यक्ष  ऋतुराज क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी पद्माकर कापसे, माजी नगरसेवक अजित राऊत, सुशील भांदिगरे यांची भाषणे झाली. आर. के. पोवार व बाबा पार्टे यांनी दि. 14 रोजी होणार्‍या कार्यक्रमाची माहिती उपस्थित कार्यकर्त्यांना  दिली.

महापौर सौ. शोभा बोंद्रे यांनी दि. 14 रोजी कोल्हापूरच्या सुपूत्राच्या होणार्‍या कौतुक सोहळ्यात शहरातील सर्व तालीम मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. लाला गायकवाड यांनी स्वागत केले.  सुरेश जरग यांनी प्रास्ताविक केले. सचिन चव्हाण यांनी आभार मानले. बैठकीला सुरेश पिसाळ, तुकाराम बापू इंगवले, दिलीप माने (रंकाळा तालीम), दीपक घोडके (वाघाची तालीम), अशोक पोवार (मोतीबाग तालीम),  ऋणमुक्‍तेश्‍वरचे थोरवत, संदीप जाधव (रंकोबा तालीम मंडळ), शशिकांत देसाई (दयावान ग्रुप), तुकाराम साळोखे (न्यू संध्यामठ), योगेश चौगुले (बापू ग्रुप), कपिल सरनाईक (अवचितपीर तालीम), रणजितसिंह जाधव (तटाकडील तालीम), पियूष चव्हाण (नाईट कट्टाा मंडळ), तानाजी पाटील (आझाद गल्‍ली), हिंदुराव घाटगे (बालगोपाल तालीम), सुशील भांदिगरे (जुना बुधवार तालीम), अतुल साळोखे, उत्तम कोराणे, 

बाबा महाडिक, प्रताप देसाई, किशोर घाटगे, वसंतराव मुळीक, शिवाजीराव ढवण, किसन कुर्‍हाडे,  अशोक पोवार, राजू साळोखे, संभाजीराव जगदाळे, अरुण चोपदार, अर्जून नलवडे  तसेच  खंडोबा तालीम, नाथागोळे तालीम, दिलबहार तालीम, वेताळ माळ तालीम, शिवाजी तालीम मंडळ, दयावान ग्रुप,  नेताजी तरुण मंडळ, बजापराव माने तालीम मंडळ, तटाकडील तालीम, रंकाळवेस, धोत्री गल्‍ली तालीम, पाटाकडील तालीम मंडळ,  फिरंगाई तालीम, सुबराव गवळी तालीम मंडळ, महाकाली तालीम मंडळ, सनगर गल्‍ली तालीम मंडळ आदी तीसहून अधिक तालीम मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.