Sun, Aug 25, 2019 03:37होमपेज › Kolhapur › मराठा समाजातील विद्यार्थांच्या प्रश्‍नांसाठी 21 रोजी सर्वव्यापी बैठक

मराठा समाजातील विद्यार्थांच्या प्रश्‍नांसाठी 21 रोजी सर्वव्यापी बैठक

Published On: Aug 15 2018 1:23AM | Last Updated: Aug 15 2018 12:36AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठा समाजातील विद्यार्थांच्या विविध शैक्षणिक प्रश्‍नांसंदर्भात दि. 21 ऑगस्ट रोजी अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयाचे संस्थाचालक, प्राचार्य आणि विद्यापीठ प्रशासन यांच्यात सर्वव्यापी बैठक घेण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व शिवसेना पदाधिकार्‍यांच्या बैठकीत झाला. 

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची भेट घेऊन मराठा समाजातील विद्यार्थांच्या प्रश्‍नांचे निवेदन दिले. राज्य सरकारने मराठा समाज व आर्थिकद‍ृष्ट्या दुर्बल घटकासाठी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत यावर्षापासून शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीसाठी आठ लाखांपर्यंत मर्यादा केली आहे. प्रवेशावेळी 50 टक्के शिक्षण शुल्क घ्यावेत, असे आदेश आहेत. जिल्ह्यातील महाविद्यालयांनी 50 टक्के शिक्षण शुल्क घेऊन प्रवेश दिलेले नाहीत ही बाब गंभीर आहे. 

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता विस्तारीत योजना सुरू आहे. या योजनेची अंमलबजावणी केली जात नसल्याने मराठा व आर्थिक मागास विद्यार्थी लाभापासून वंचित आहेत. मराठा समाजातील विद्यार्थांना 50 टक्के फी सवलत मिळावी, शासनाने शिक्षण संस्थांची दप्‍तर तपासून शंभर टक्के फी घेतली असल्यास 50 टक्के परत द्यावी. प्रवेशावेळी शंभर टक्के फी मागणार्‍या महाविद्यालयांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, कुलगुरू डॉ. शिंदे व शिवसेना शिष्टमंडळ यांची बैठक झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. डी. आर. मोरे यांच्यासह शिवसेना शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, सुजित चव्हाण, अशोक निकम, अनिल घोसाळकर, शुभांगी पोवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.