Mon, Apr 22, 2019 04:29होमपेज › Kolhapur › जिज्ञासा तर्फे ‘युनिफाईड यंग अ‍ॅथलिट प्रोग्रॅम’ उत्साहात

...त्यांची जिद्द धडधाकटांना भारी

Published On: Dec 17 2017 1:29AM | Last Updated: Dec 16 2017 11:49PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

धावणे, उड्या, फेकी यासह विविध मैदानी खेळांत धडधाकटांनाही भारी पडणारे प्रदर्शन दिव्यांग बालचमूंनी केले. निमित्तं होतं ‘युनिफाईड यंग अ‍ॅथलिट प्रोग्रॅम’ उपक्रमाचे. 

‘स्पेशल ऑलंपिक्स भारत’ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय असणार्‍या  जिज्ञासा विकास मंदिर संस्थेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी नगरसेवक किरण नकाते, मुख्याध्यापिका स्मिता दिक्षीत, क्रीडाशिक्षक राजू जाधव, विशाल दिक्षीत, प्रशांत माळी, प्रशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

उपक्रमात सामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने दिव्यांग विद्यार्थ्यांनी धावणे, गोळाफेक, स्पॉट जंप, अडथळा शर्यत अशा विविध उपक्रमांत  उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात यजमान जिज्ञासा विकास मंदिरसह वारणा चैतन्य मतिमंद मुलांची शाळा वारणानगर, संजीवन यशवंत विद्यालय, सन्मित्र विद्यालय, तेजस विद्यालय, ए.बी. सरनोबत संवाद, इंदुमती जाधव, वि. म. लोहिया, व्ही. जे. देशमुख  हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. पालकांसह क्रीडाप्रेमींनी बालचमूंना प्रोत्साहन दिले.