Tue, May 21, 2019 18:33होमपेज › Kolhapur › विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचा पुन्हा एल्गार !

विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचा पुन्हा एल्गार !

Published On: Dec 12 2017 2:05AM | Last Updated: Dec 11 2017 11:47PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

प्रलंबित न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी विनाअनुदानित शिक्षकांनी शासनाविरोधात पुन्हा एल्गार पुकारला आहे. उद्या (दि. 13) हिवाळी अधिवेशनावर दंडवत मोर्चा काढण्यात येणार आहे. 

कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक 15 वर्षांपासून विनावेतन काम करीत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यातील काहीजण सेवानिवृत्त झाले असून काही जणांना अनुदान मिळेल, या अपेक्षेने मृत्यू झाला आहे. प्रलंबित न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी आतापर्यंत विनाअनुदानित शिक्षकांनी सुमारे 144 हून अधिक आंदोलन केली आहेत; परंतु याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले आहे.

काही पात्र शाळांना 2017 मध्ये 20 टक्के अनुदान देण्यात आले. 1 व 2 जुलै रोजी घोषित केलेल्या शाळांसाठी अनुदानाची तरतूद केलेली नाही. आयुष्यभर आंदोलन करूनही शासनाच्या गलथान कारभारामुळे संतापलेल्या विनाअनुदानित शिक्षकांनी आर-पारची लढाईचा मार्ग स्वीकारला आहे. जोपर्यंत शासन अनुदान देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

मराठवाडा, विदर्भातील शाळा बंद

महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. यामुळे मराठा आणि विदर्भातील सगळ्या विनाअनुदानित शाळा बेमुदत बंद राहणार आहेत.