Wed, Jan 23, 2019 06:34होमपेज › Kolhapur › इच्छामरणास परवानगी द्या

इच्छामरणास परवानगी द्या

Published On: Jul 20 2018 1:11AM | Last Updated: Jul 20 2018 12:14AMकोल्हापूर : प्रतिनिधी

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या न्याय्य प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाने कोणतेही ठोस पाऊल उचललेे नाही. त्यामुळे विनाअनुदानित शिक्षकांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. यासंदर्भात त्यांना निवेदन दिले आहे. 

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक गेल्या 17 वर्षांपासून विविध मागण्यांसाठी शासनाबरोबर संघर्ष करीत आहेत. 20 टक्के अनुदान घेणार्‍या शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे, अघोषित शाळा निधीसह घोषणा व्हावी, अतिरिक्‍त शिक्षकांना सेवा संरक्षण मिळावे, आश्रमशाळांना शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी विनाअनुदानित शिक्षकांनी दि. 7 जुुलैपासून सेवाग्राम ते नागपूर पदयात्रा काढली. विनाअनुदानित शाळांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे पुन्हा आश्‍वासन शिक्षणमंत्र्यांकडून मिळाले; परंतु ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला आहे. 

भर पावसात हजारो शिक्षक, शिक्षिका रस्त्यावर झोपले. त्यानुसार शिक्षकांनी यशवंत स्टेडियमवर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. सहा दिवसांपासून उपषोण सुरू असताना शासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे इच्छामरण्याची परवानगी मागितली आहे.