Mon, Jun 17, 2019 03:17होमपेज › Kolhapur › कॉ. उमा पानसरेंसह अन्य साक्षीदारांच्या जबाबात विसंगती

कॉ. उमा पानसरेंसह अन्य साक्षीदारांच्या जबाबात विसंगती

Published On: Jan 20 2018 1:39AM | Last Updated: Jan 20 2018 1:28AMकोल्हापूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे खून खटल्यात श्रीमती उमा पानसरे, संजय साडविलकरसह अन्य साक्षीदारांनी ‘एसआयटी’ला दिलेल्या जबाबात कमालीची विसंगती दिसून येत आहे. कायदेशीर आधाराअभावी संबंधितांच्या साक्षी खटल्यातून वगळाव्यात, अशी मागणी आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडेंच्या वकिलांनी शुक्रवारी न्यायालयात केली. कॉ. पानसरे खून प्रकरणातील आरोपी डॉ. तावडे यानी दाखल केलेल्या जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश (2) एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आरोपीचे वकील समीर पटवर्धन व अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयात आज दोन तास युक्तिवाद केला.  विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यावेळी उपस्थित होते. कॉ. पानसरे खूनप्रकरणी ‘एसआयटी’चे दोषारोपपत्र हे ‘सीबीआय’चे कॉपीपेस्ट असल्याचा मुद्दाही अ‍ॅड. पटवर्धन यांनी उपस्थित केला. कॉ. पानसरे खूनप्रकरणी तपासाधिकार्‍यांनी उमा पानसरे,  साडविलकर, नवनाथ कुंभारसह एका शाळकरी मुलाचा जबाब नोंदविला आहे. त्यांच्याही जबाबात विसंगती आहेत. उर्वरित सुनावणी शनिवारी होणार आहे.