Tue, Aug 20, 2019 15:12होमपेज › Kolhapur › उद्धव ठाकरेंच्या सभेची गडहिंग्लजला जय्यत तयारी (video)

उद्धव ठाकरेंच्या सभेची गडहिंग्लजला जय्यत तयारी (video)

Published On: Apr 20 2019 3:37PM | Last Updated: Apr 20 2019 3:51PM
गडहिंग्लज :  प्रतिनिधी

कोल्हापूर लोकसभेसाठी 23 एप्रिलला मतदान होत आहे. भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी गडहिंग्लजला आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा सायंकाळी सात वाजता होणार आहे. या सभेसाठी शिवराज महाविद्यालयाच्या पटांगणांवर भव्य तयारी करण्यात आली आहे. आकर्षक व्यासपीठाची उभारणी केली असून बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. हजारांच्या संख्येत येणार असल्याने या ठिकाणी पार्किंग व्यवस्थेसह बैठक व्यवस्थेसाठीही शिवसैनिकांनी नियोजन केले आहे. ‘लोकसभेचा गड जिंकून देणार..गडहिंग्लज’ या ब्रीदवाक्यासोबत व्यासपीठाची मांडणी केली आहे. 

लोकसभेच्या रणांगणात गडहिंग्लज-आजरा व चंदगड तालुक्यातील मताधिक्क्याला फार मोठे महत्त्व प्राप्‍त झाले आहे. या ठिकाणाहून वाढीव मताधिक्य घेणारा बेरजेच्या गणितात जाणार आहे. साहजिकच हीच गोष्ट लक्षात ठेवून शिवसेनेने आपल्या जोडण्या लावल्या आहेत. याचाच भाग म्हणून या सभेचे गडहिंग्लजला केले आहे. यानिमित्ताने उद्धव ठाकरे हे या सहा महिन्यांमध्ये दुसर्‍यांदा गडहिंग्लजला येत आहेत. तथापि सभेचा संपूर्ण  परिसर शिवसेनामय झाला आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या आगमनासह ते काय बोलणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.