होमपेज › Kolhapur › दोन वर्षांनंतर 24 जणांना अखेर पदोन्नती

दोन वर्षांनंतर 24 जणांना अखेर पदोन्नती

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 14 2018 11:41PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेतील खुल्या प्रवर्गातील 24 जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. यात 18 शिपायांना कनिष्ठ सहायक म्हणून तर  4 कनिष्ठ सहाय्यकांना  वरिष्ठ सहायक, एका वरिष्ठ सहाय्यकाला कक्ष अधीक्षक आणि  एका अधिक्षकाला कक्ष अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे. तब्बल दोन वर्षे प्रशासकीय लढा दिल्यानंतर हे यश मिळाल्याने कर्मचार्‍यातून आनंद व्यक्त होत आहे. पदोन्नती आणि रिक्त जागेवर समायोजनाचे आदेश सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी बुधवारी काढले. 

जि.प.मध्ये गेल्या दोन वर्षांपासून पदोन्नतीवरुन प्रशासकीय घोळ सुरु होता. पदोन्नतीवरुन वशिलेबाजी झाल्याचे सांगत कर्मचार्‍यांनी तक्रार निवारणच्या बैठकीतही यावर आक्षेप घेतला होता. यानंतर यात स्वत: सीईओ डॉ. कुणाल खेमनार आणि ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी लक्ष घालून कर्मचार्‍यांसमवेत बैठक लावून सेवाज्येष्ठता यादी तयार करण्याच्या सुचना दिल्या. कर्मचार्‍यांच्या हरकतीनंतर सेवाज्येष्ठता आणि गुणानुक्रम यापैकी ज्यात सरस ठरेल ते गृहीत धरायचे ठरवून अंतिम यादी प्रसिध्द करण्यात आली. त्यानुसार सेवाज्येष्ठता व गुणानुक्रमानुसार खुल्या प्रवर्गातील पहिल्या 24 जणांना पदोन्नती जाहीर करण्यात आली. मागासवर्गीय पदोन्नतीला न्यायालयाची स्थगिती असल्याने ती उठल्यानंतरच दुसर्‍या टप्प्यात त्यांची पदोन्नती आणि समायोजन होणार आहे. 

20 शिपायांना कनिष्ठ सहायक म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्यापैकी दोघांनी नकार दिल्याने 18 जणांची ऑर्डर काढण्यात आली. यापैकी 9 जणांची मुख्यालयात तर उर्वरीतांची पंचायत समित्यांमध्ये ऑर्डर काढण्यात आली आहे. यामध्ये फजलेकरीम मुल्ला, संदीप सुतार, सुरेखा खटावकर, मंदाकिनी लोंढे, रमेश गवळी, भारती सुतार, अर्चना काशीद, सचिन चव्हाण, विश्‍वास गायकवाड, सागर चव्हाण, रेशमा पेटकर, आदेश साठे, कपिल बिरजे, अजय कदम, ज्योती माळवदे, राजश्री चव्हाण, अर्चन खाडे, अर्चना निगडे यांचा समावेश आहे. 

अधिक्षक ज्योती साळोखे यांना कक्ष अधिकारी म्हणून तर वरिष्ठ सहाय्यक असलेल्या जयश्री रेवडे यांना अधिक्षक म्हणून शिरोळ पंचायत समितीला नियुक्ती देण्यात आली.  कनिष्ठ सहाय्यक असलेल्या चौघांना वरिष्ठ सहाय्यक म्हणून पदोन्नती मिळाली. सिंधूताई भोसले प्राथमिक शिक्षण, मिलींद गुरव चंदगड पंचायत समितीला, महेश निकम यांची ग्रामपंचायत विभागात तर दयानंद पाटील यांची आयसीडीएस म्हणून भूदरगडला नियुक्ती देण्यात आली आहे. या नियुक्तीमध्ये सामान्य प्रशासनचे कक्ष अधिकारी संजय अवघडे समन्वयाची भूमिका निभावली.