होमपेज › Kolhapur › काळम्मावाडी धरणातून  दोन हजार क्युसेक विसर्ग

काळम्मावाडी धरणातून  दोन हजार क्युसेक विसर्ग

Published On: Jul 20 2018 1:11AM | Last Updated: Jul 20 2018 12:29AMकाळम्मावाडी : वार्ताहर

दूधगंगानगर (ता. राधानगरी) येथे राजर्षी शाहू जलाशयातून दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदी पात्रात करण्यात येत असल्याने नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे. त्यामुळे सुळंबी, सोळांकूर बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दूधगंगा काठावरील गावांना सावध राहण्याचा इशारा पाटबंधारेकडून देण्यात आला आहे. 

गुरुवारअखेर धरण परिसरात 2185 मि. मी. पाऊस झाला असून, धरणाची पाणी पातळी 642.80 मीटर आहे. पाणी साठा 613.520 द.ल.घ.मी (21.86 टी. एम. सी.) असून,  धरण  85 टक्के भरले आहे. धरणाच्या पाच वक्राकार दरवाज्यांतून दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग 4 वाजून 30 मिनिटांनी दूधगंगेत करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी उपअभियंता एम. एम. किटवाडकर, शाखा अभियंता एस. बी. यादव, महादेव सावंत, बाळासो पाटील, शांताराम हवालदार, ए. व्ही. जाधव, दत्ता गुरव, अनिल चौगले, कालवा निरीक्षक राजेंद्र जांगनुरे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.