Sat, Jul 20, 2019 15:20होमपेज › Kolhapur › बेरडवाडी तलावात दोन शाळकरी मुले बुडाली

बेरडवाडी तलावात दोन शाळकरी मुले बुडाली

Published On: Mar 07 2018 1:52AM | Last Updated: Mar 07 2018 1:37AMसेनापती कापशी : प्रतिनिधी

बेरडवाडी (ता. कागल) येथील अर्जुन रायप्पा नाईक व आदित्य  सिदाप्पा नाईक ही दोन शाळकरी मुले तलावात बुडाली. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती; पण दोघांचा शोध लागला नाही.
राहुल बसाप्पा नाईक (इ. 9 वी) व योगेश बसाप्पा नाईक (6 वी) ही मुले रंगपंचमी खेळून अंघोळीला तलावाकडे जनावरे घेऊन गेली होती. त्यांच्या सोबत अर्जुन नाईक (5 वी) व आदित्य नाईक (2 री) गेले होते. ते दोघे तलावाच्या कडेला बसले होते. 

काही वेळाने राहुल व योगेश यांना अर्जुन व आदित्य दिसले नाहीत. शोधाशोध केली. घरी येऊन पाहिले; पण घरात नाहीत म्हणून तलावाकडे गेले. त्यांना तलावाच्या कडेला कपडे दिसले. त्यावेळी त्या दोघांनी घाबरून तेथून पाहुण्यांच्या गावी बुगटे आलूरला पळ काढला. 

दरम्यान, अर्जुनची आई शालन नाईक यांना तलावाशेजारी अर्जुनचे कपडे व चप्पल दिसले. चौकशीअंती चारही मुले गावात नाहीत, असे त्यांना कळले. सर्वत्र शोधाशोध सुरू झाली.  दरम्यान, बुगटे आलूरच्या पाहुण्यांनी मुले गावी आल्याचे सांगितले. राहुल व योगेशने तलावावर घडलेली हकिकत सांगितली. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती; पण मुले सापडली नाहीत.